ACB Trap News | एन.ए. ऑर्डर काढून दिल्याच्या मोबदल्यात बक्षीस म्हणून लाच घेणाऱ्या महसूल सहायक व पुरवठा निरीक्षकास एसीबीकडून अटक

नागपुर : पोलीसनामा ऑनलाइन – शेतीची एन.ए. ऑर्डर (NA Order) काढून दिल्याच्या मोबदल्यात बक्षीस म्हणून 50 हजार रुपये लाचेची मागणी करुन 25 हजार रुपये पहिला हप्ता स्वीकारताना (Accepting Bribe) रामटेक तहसील कार्यालयातील महसूल सहायक (Revenue Assistant) व पुरवठा विभागातील पुरवठा निरीक्षक (Supply Inspector) या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB Trap News) सापळा रचून अटक केली. नागपूर एसीबीच्या पथकाने (ACB Trap News) ही कारवाई गुरुवारी (दि.20) केली.

महसूल सहायक अनिल मधुकर उंदिरवाडे Anil Madhukar Undirwade (वय 41), पुरवठा निरीक्षक अतीश सुभाष जाधव Atish Subhash Jadhav (वय 31) असे लाच स्वीकारताना अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. याबाबत रामटेक तालुक्यातील भिलेवाडा पोस्ट भोंदेवडा येथील 55 वर्षीय व्यक्तीने नागपूर एसीबीकडे (ACB Trap News) तक्रार केली आहे.

तक्रारदार यांनी त्यांच्या मालकीचे मौजे खुमारी येथील 3 एकर शेती रहिवासी प्रयोजनसाठी एन.ए. करायची होती. रामटेक तहसीलदार यांनी एन.ए. ची ऑर्डर काढून दिली होती. त्यानंतरही अनिल उंदिरवाडे यांनी एन.ए.ऑर्डर काढून दिल्याचे मोबदल्यात बक्षीस म्हणून फिर्यादीस 50 हजार रुपये लाचेची मागणी (Demanding a Bribe) केली. तसेच 25 हजार रुपयांचा पहिला हप्ता पुरवठा निरीक्षक अतीश जाधव यांच्याकडे देण्यास सांगितले.

तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी नागपूर लाचलुचपत प्रतिबंधक (Nagpur ACB Trap News) कार्यालयात याबाबत तक्रार केली. एसबीच्या अधिकाऱ्यांनी पंचासमक्ष पडताळणी केली असता अनिल उंदिरवाडे याने 50 हजार रुपये लाचेची मागणी करुन लाचेचा पहिला हप्ता 25 हजार रुपये अतीश जाधव यांच्याकडे देण्यास सांगितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पथकाने सापळा रचला. उंदिरवाडे यांच्यासाठी लाचेची रक्कम स्वीकारताना
जाधव याला रंगेहाथ पकडण्यात आले.
यानंतर अनिल उंदिरवाडे याला ताब्यात घेण्यात आले.
दोघांवर नागपूर ग्रमीण पोलिसांच्या (Nagpur Rural Police) रामटेक पोलीस ठाण्यात (Ramtek Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूर परिक्षेत्र
पोलीस अधीक्षक राहुल माकणीकर (SP Rahul Maknikar),
अपर पोलीस अधीक्षक संजय पुरंदरे (Sanjay Purandare),
वाचक पोलीस उप अधीक्षक अनामिका मिर्झापूरे (DySP Anamika Mirzapure)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रवीण मुरलीधरराव लाकडे
(Police Inspector Pravin Muralidharrao Lakde)
पोलीस अंमलदार विकास सायरे, सारंग बालपांडे, गिता चौधरी,
अस्मिता मेश्राम, आशू श्रीरामे, करुणा सहारे, राजू जांभूळकर यांच्या पथकाने केली.

Pune BJP Felicitated Pune Police | पुणे शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने
पोलीस अंमलदार प्रदीप चव्हाण व अमोल नाझण यांचा सत्कार

Aditya Roy Kapur And Ananya Pandey | आदित्य व अनन्या रोमॅंटिक व्हेकेशनवरुन परतले;
एअरपोर्टवर झाले स्पॉट

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा