Pune BJP Felicitated Pune Police | पुणे शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने पोलीस अंमलदार प्रदीप चव्हाण व अमोल नाझण यांचा सत्कार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune BJP Felicitated Pune Police | पुणे शहर पोलिस दलातील अंमलदार प्रदीप चव्हाण (Police Pradeep Chavan) आणि अमोल नाझन (Police Amol Nazan) यांनी जीवाची बाजी लावून राष्ट्रीय तपास संस्थेला (NIA) हव्या असलेल्या इम्रान खान आणि युनुस साकी या दोन्ही दहशतवाद्यांना मंगळवारी रात्री अटक केली (Terrorist Arrest In Pune) . या कामगिरीबद्दल पुणे शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने या दोन्ही पोलिस कर्मचाऱ्यांचे आणि पुणे पोलिसांचे अभिनंदन करण्यात आले. पोलिसांचे अभिनंदन करणारे पत्र गुरुवारी पुण्याचे पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar), पोलिस सहआयुक्त संदीप कर्णिक (IPS Sandeep Karnik) यांना देण्यात आले. त्यासोबत शाल आणि पुष्पगुच्छ देऊन या दोन्ही कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. (Pune BJP Felicitated Pune Police)

पुणे पोलिस आपले कर्तव्य बजावण्यासाठी सक्रिय आणि तत्पर असतात, हे या निमित्ताने पुन्हा एकदा दिसून आले. हे दोन्ही दहशतवादी ‘आयसिस’ (ISIS) या आंतरराष्ट्रीय संघटनेशी संबंध असलेल्या ‘सुफा’शी संबंधित होते. त्यांचा शोध राष्ट्रीय तपास यंत्रणेचे अधिकारी गेल्या अनेक दिवसांपासून घेत होते. प्रदीप चव्हाण आणि अमोल नाझन या दोन्ही पोलिस कर्मचाऱ्यांनी केलेली कामगिरी निश्चितच कौतुकास्पद आहे. (Pune BJP Felicitated Pune Police)

यावेळी शहराध्यक्ष धीरज घाटे (Dheeraj Ghate) यांच्यासह पुण्याचे माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक (Jagdish Mulik), भारतीय जनता किसन मोर्चा चे प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे, माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, राजेश येनपुरे, सुशील मेंगडे, दीपक नागपुरे, दीपक पोटे, राघवेंद्र बाप्पू मानकर, प्रशांत हरसुले, अजय खेडेकर, उमेश गायकवाड धनंजय जाधव, पुष्कर तुळजापूरकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.

सेवेवर कार्यरत असताना संशयास्पद हालचाली करताना आढळल्याने पुरेशी माहिती घेऊन दहशतवाद्यांना पकडण्याचे
काम हे जितके बहादुरीचे आहे तितकेच चाणाक्षपणाचेही. या दोघांनी जी कामगिरी केली आहे ती पोलिस दलातील इतर
सर्वांना प्रेरणा देणारी आहे, असे या पत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे.

यापुढेही पुणे पोलिस अशाच पद्धतीने गुन्हेगारांचा आणि दहशतवाद्यांचा चोख बंदोबस्त करतील,
अशी आशा या निमित्ताने शहराध्यक्ष घाटे यांनी व्यक्त करण्यात आली.

Mohan Joshi On Pune Metro | गेल्या 2400 दिवसांमध्ये पुणे मेट्रो किती इंच पुढे सरकली? मोहन जोशींचा संतप्त सवाल

Pune Police News | ‘महिलांसोबत गैरकृत्य करणाऱ्याविरोधात कडक कारवाई करणार’, महिला-मुलींना सुरक्षिततेचे धडे देण्यासाठी ACP अश्विनी राख उतरल्या रस्त्यावर