ACB Trap News | लाच घेताना RTO मधील क्लास 1 अधिकारी, कनिष्ठ लिपिक व पंटर अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

लातूर : पोलीसनामा ऑनलाइन – ACB Trap News | ट्रॅव्हल्स व्यावसायिकाकडून तीन हजार रुपये लाच स्वीकारताना (Accepting Bribe Case) लातूर उप प्रादेशिक परिवहन विभागातील (Latur Sub Regional Transport Department) कनिष्ठ लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau Latur) रंगेहाथ पकडले. यानंतर एसीबीच्या अधिकाऱ्यांनी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी (क्लास वन) व खासगी पंटरला ताब्यात घेतले. ही कारवाई लातूर उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात गुरुवारी (दि.12) केली. (ACB Trap News)

उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चिंतामण भोये Vijay Chintaman Bhoye (वय -46 रा.खारघर,जिल्हा रायगड), कनिष्ठ लिपिक प्रमोद उत्तम सोनसळी Junior Clerk Pramod Uttam Sonsali (वय 44), खाजगी इसम गिलानी मेहबूब शेख (वय-49 रा. इंडिया नगर अमन कॉलनी लातूर) असे लाच घेताना पकडण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. याबाबत 50 वर्षाच्या ट्रॅव्हल्स व्यावसायिकाने लातूर एसबीकडे (Latur ACB Trap) तक्रार केली आहे.

तक्रारदार यांचा ट्रॅव्हल्सचा व्यवसाय असून त्यांची ‘ना वापर’ प्रकारात असलेली एक ट्रॅव्हल गाडी ‘वापर’ प्रकारात आणायची होती. तसेच त्या गाडीवरचा टॅक्स आकारण्यासाठी विजय भोये यांनी सुरुवातीला 5 हजार रुपयांची मागणी केली. तडजोडी अंती तीन हजार रुपयांची मागणी केली. तक्रारदार यांनी याबाबत एसीबी कार्यालयात तक्रार केली. (ACB Trap News)

एसीबीच्या अधिकाऱ्यांनी पंचासमक्ष पडताळणी केली असता उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चिंतामण भोये यांनी
5 हजार रुपयांची लाच मागून तडजोडी अंती 3 हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. लाचेची रक्कम कनिष्ठ लिपिक
प्रमोद सोनसळी यांच्याकडे देण्यास सांगितले. पथकाने उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात सापळा रचला.
तक्रारदार यांच्याकडून लाच स्वीकारताना सोनसळी याला रंगेहाथ पकडण्यात आले आहे.
लाच रक्कम स्वीकारण्यासाठी यातील आरोपी खासगी व्यक्ती गिलानी शेख याने प्रोत्साहन दिले.
तिघांवर विवेकनंद पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पुणे एसीबीचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे (SP Amol Tambe) यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर एसीबीचे
पोलीस निरीक्षक श्रीराम शिंदे (PI Sriram Shinde), पोलीस अंमलदार महाशब्दे, दिनेश माने, भावसार यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

ACB Trap News | लाच घेताना महिला दुय्यम निबंधक अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

ACB Trap On Two Police Officers | 1 लाख रूपयाची लाच घेताना सहाय्यक पोलिस निरीक्षक (API) अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात, पोलिस उपनिरीक्षक (PSI) देखील गोत्यात, 2 अधिकार्‍यावरील कारवाईने पोलिस दलात प्रचंड खळबळ

42 मुलांना सैन्यदलात नोकरी देण्याच्या आमिषाने 2 कोटींची फसवणूक, कोंढवा परिसातील प्रकार