ACB Trap News | 10 हजार रुपये लाच घेताना सरपंच अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाइन – महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत वैयक्तिक सिंचन विहीरीचे कामगार लावून केलेल्या कामांच्या मजुरांच्या जॉबकार्डवर सही करणे करिता 10 हजार रुपये लाच स्वीकारताना (Accepting Bribe) उमरखेड तालुक्यातील कोपरा खुर्द ग्रामपंचायतच्या (Kopra Khurd Gram Panchayat) संरपंचाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB Trap News) सापळा रचून रंगेहाथ पकडले. सुनील शंकर वाघमारे Sunil Shankar Waghmare (वय-38 रा. कोपरा खुर्द) असे लाच घेताना पकडण्यात आलेल्या सरपंचाचे नाव आहे. एसीबीच्या पथकाने (ACB Trap News) ही कारवाई बुधवारी (दि.19) ढानकी ते उमरखेड रोडवरील श्री रविचन्द्र गादिया यांचे लेआऊट मधील मोकळी जागेत केली.

याबाबत कोपरा खुर्द येथील 29 वर्षीय व्यक्तीने यवतमाळ एसीबीकडे (ACB Trap News) सोमवारी (दि.17) लेखी तक्रार केली होती. तक्रारदार यांचे आईच्या नावाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत वैक्तिक सिंचन विहीर मंजुर (Irrigation Well Sanctioned) झाली आहे. या विहिरीचे कामगार लावून केलेल्या कामांच्या मजुरांच्या जॉबकार्डवर सही करणे करिता सरपंच सुनील वाघमारे यांनी दहा रुपये लाचेची मागणी केली. याबाबत तक्रारदार यांनी लेखी तक्रार केली होती.

यवतमाळ एसीबीच्या पथकाने (Yavatmal ACB Trap News) बुधवारी पडताळणी केली असता सरपंच सुनील वाघमारे यांनी स्वत:करीता दहा हजार रुपये लाचेची मागणी करुन लाच स्वीकारण्याचे मान्य केले. पथकाने सापळा रचून सरपंच सुनील वाघमारे याला तक्रारदार यांच्याकडून लाच घेताना रंगेहाथ पकडले.
वाघमारे यांच्यावर बिटरगाव पोलीस ठाण्यात (Bitargaon Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई अमरावती परिक्षेत्राचे (Amravati Zone) पोलीस अधीक्षक मारुती जगताप (SP Maruti Jagtap),
अपर पोलीस अधीक्षक देविदास घेवारे (Addl SP Devidas Gheware),
यवतमाळ एसीबीचे पोलीस उपअधीक्षक उत्तम नामवाडे (DySP Uttam Namwade)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनायक कारेगावकर (PI Vinayak Karegaonkar),
पोलीस निरीक्षक अमित वानखेडे (PI Amit Wankhede) पोलीस अमंलदार सचिन भोयर, महेश वाकोडे,
अब्दुल वसीम, भागवत पाटील आणि चालक श्रेणी पोलीस उपनिरीक्षक संजय कांबळे यांच्या पथकाने केली.

Terrorists Arrested in Pune | कोथरूडमधून अटक केलेले 2 दहशतवादी दीड वर्षापासून पुण्यात वास्तव्यास;
पोलीस आयुक्त रितेश कुमार यांची माहिती (Video)