Terrorists Arrested in Pune | कोथरूडमधून अटक केलेले 2 दहशतवादी दीड वर्षापासून पुण्यात वास्तव्यास; पोलीस आयुक्त रितेश कुमार यांची माहिती (Video)

‘एनआयए’च्या गुन्ह्यात फरार, दोघांवर पाच लाखांचे बक्षीस

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Terrorists Arrested in Pune | कोथरुड भागातून पुणे पोलिसांनी दोन दहशतवाद्यांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेले आरोपी हे दहशतवादी (Terrorists Arrested in Pune) हे मूळचे मध्यप्रदेशातील (Madhya Pradesh) रतलामचे (Ratlam) रहिवासी असून ते ‘आयसीस’ या दहशतवादी संघटनेची (ISIS Terrorist Organization) उपसंघटना ‘सुफा’ या संघटनेशी (Sufa Organization) संबंधित असल्याची माहिती तपासात निष्पन्न झाली आहे. स्फोटके बाळगल्याप्रकरणी एनआयएने (राष्ट्रीय तपास संस्था-National Investigation Agency (NIA) त्यांच्यावर गुन्हा (FIR) दाखल केला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर ते पुण्यात वास्तव्यास आले. पुण्यातील कोंढवा परिसरात मागील दीड वर्षापासून राहत असल्याची माहिती पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमारI (IPS Ritesh Kumar) यांनी दिली.

 

 

मोहम्मद युनूस मोहम्मद याकू साकी Mohammad Yunus Mohammad Yaku Saki (वय -24), मोहम्मद इम्रान मोहम्मद युसूफ खान Mohammad Imran Mohammad Yusuf Khan (वय-23, दोघे सध्या रा. चेतना गार्डन, मीठानगर, कोंढवा-Kondhwa) अशी अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची नावे आहेत. त्यांच्याबरोबर असलेला साथीदार मोहम्मद शहनवाज आलम Mohammad Shahnawaz Alam (वय -31) हा फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

 

 

 

कोथरुड पोलीस ठाण्यातील (Kothrud Police Station) पोलीस कर्मचारी प्रदीप चव्हाण (Pradeep Chavan) आणि अमोल नाझन (Amol Nazan) हे गस्त घालत होते. त्यावेळी तिघेजण दुचाकी चोरण्याच्या तयारीत (Pune Crime News) होते. पोलिसांना संशय आल्याने इम्रान खान आणि युनूस साकी यांना ताब्यात घेतले तर मोहम्मद आलम हा फरार झाला. त्यानंतर खान आणि साकी राहत असलेल्या घराची झडती घेण्यात आली. त्यावेळी घरामधून एक काडतूस (Cartridge), चार मोबाईल (Mobiles), लॅपटॉप (Laptop) जप्त करण्यात आले. पोलिसांनी आरोपींकडे केलेल्या चौकशीत एनआयएने राजस्थानमध्ये (Rajasthan) गुन्हा दाखल केल्याची माहिती समोर आली. गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपी फरार झाले होते. त्यांची माहिती देणाऱ्यास एनआयए कडून पाच लाखाचे बक्षीस जाहिर केले होते, अशी माहिती आयुक्त रितेश कुमार यांनी दिली.

 

दीड वर्षापासून पुण्यात वास्तव्यास

याप्रकरणाचा सखोल तपास करण्यात येत आहे. आरोपी पुण्यात गेल्या दीड वर्षांपासून वास्तव्यास होते. पुण्यात ते कोणाच्या संपर्कात होते, यादृष्टीने तपास करण्यात येत असल्याचे पोलीस आयुक्त रितेश कुमार (CP Retesh Kumaarr) यांनी सांगितले. दरम्यान, एनआयएने गुन्हा दाखल केलेले आरोपी रतलाममधील सुफा या दहशतवादी संघटनेच्या (Terrorists Arrested in Pune) संपर्कात होते. देशविघातक कारवाई करण्याच्या तयारीत होते. त्यांच्याविरुद्ध एनआयने स्फोटके बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.

 

जयपूरमध्ये बाँबस्फोटाचा कट

राजस्थानातील जयपूर मध्ये बॉम्बस्फोट (Bomb blast in Jaipur) घडविण्याच्या कट इम्रान खान,
युनूस साकी आणि त्यांचा साथीदार फिरोझ पठाण यांनी रचला होता.
एनआयएने याप्रकरणात चौकशी सुरु केल्यानंतर तिघेजण पसार झाले होते.
त्यांची माहिती देणाऱ्यांना एनआयएने पाच लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.

 

‘सिंघम’ पोलिसांचे कौतुक

कोथरुड परिसरात संशयित दहशतवाद्यांना पकडणारे पोलीस शिपाई प्रदीप चव्हाण,
अमोल नाझण यांच्या जिगरबाज कामगिरीचे कौतुक करण्यात आले आहे. पोलीस शिपाई चव्हाण,
नाझण यांनी संशयित दहशतवादी खान आणि साकी यांना पकडले.
तेव्हा त्यांनी खोटी नावे सांगितली होती. चव्हाण, नाझण यांनी दोघांचे मोबाइल क्रमांक विचारले.
मोबाइल क्रमांकाची ॲपद्वारे पडताळणी करण्यात आली. तेव्हा आरोपींनी सांगितलेली नावे खोटी असल्याचे उघडकीस आले. चव्हाण आणि नाझण यांचा संशय बळावला. त्यांनी खान आणि साकी यांना ताब्यात घेऊन चौकशी केली. चव्हाण आणि नाझण यांनी त्वरीत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना या घटनेची माहिती दिली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन चौकशी सुरु केली. संशयित दहशतवाद्यांना पकडणारे चव्हाण आणि नाझण यांच्या कामगिरीचे कौतुक पोलीस आयुक्त रितेश कुमार, सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक (IPS Sandeep Karnik) यांनी केले आहे.

 

Web Title : Terrorists Arrested in Pune | 2 terrorists arrested from Kothrud lived in Pune for one and a half years;
Information of Police Commissioner Ritesh Kumar (Video)

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा