ACB Trap News | 7 हजार रुपयांची लाच स्वीकारताना ST च्या आगार प्रमुखासह वाहक अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

बुलढाणा : पोलीसनामा ऑनलाइन – पंढरपूर यात्रेदरम्यान (Pandharpur Yatra) एसटी बसमध्ये स्टोव्ह पेटवून स्वयंपाक केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. याप्रकरणी कारवाई न करण्यासाठी सात हजार रुपये लाच स्वीकारताना (Accepting Bribe) एसटी महामंडळाच्या (ST Corporation) बुलढाणा आगार प्रमुखाला (Buldhana Bus Depot) आणि एका वाहकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB Trap News) सापळा रचून अटक (Arrest) केली आहे. ही कारवाई सोमवारी (दि.21) रात्री उशिरा बुलढाणा-खामगाव रस्त्यावर (Buldhana-Khamgaon Road) करण्यात आली. एसबीच्या कारवाईमुळे (ACB Trap News) खळबळ उडाली आहे.

आगार प्रमुख संतोष महादेव वानेरे (Santosh Mahadev Vanere), एसटी बसचे वाहक महादेव दगडू सावरकर (Mahadev Dagdu Savarkar) असे लाच घेताना पकडण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याबाबत तक्ररारदार यांनी एसीबीकडे तक्राकर दिली आहे.

पंढरपूर यात्रेसाठी बुलढाणा आगारातून काही बसेस सोडण्यात आल्या होत्या. यावेळी बसमध्ये स्टोव्ह पेटवून काही कर्मचाऱ्यांनी स्वयंपाक (Cooking) केला. याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या प्रकरणात कारवाई न करण्यासाठी आगार प्रमुख संतोष वानेरे याने तक्रारदार यांच्याकडे 40 हजार रुपये लाचेची मागणी (Demanding Bribe) केली होती. तडजोडी अंती 35 हजार रुपये देण्याचे ठरले होते. ठरलेल्या रकमेपैकी वानेरे याने 28 हजार रुपयांची लाच यापूर्वीच स्वीकारली होती. उर्वरित सात हजार रुपयांसाठी त्याने तक्रारदार यांच्याकडे तगादा लावला होता. याबाबत तक्रारदार यांनी बुलढाणा एसीबीकड (Buldhana ACB Trap News) तक्रार केली.

एसीबीच्या पथकाने पंचासमक्ष पडताळणी केली असता आगार प्रमुख संतोष वानेरे याने लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न
झाले. त्यानुसार पथकाने बुलढाणा-खामगाव रस्त्यावर सापळा रचला.
लाचेची उर्वरीत सात हजार रुपये लाच स्वीकारताना आगार प्रमुख वानेरे आणि एसटी बसचे वाहक महादेव दगडू सावरकर
यांना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यांतर्गत (Prevention of Corruption Act)
गुन्हा दखल करुन अटक केली आहे.

ही कारवाई पोलीस उप अधीक्षक शितल घोगरे (DySP Shital Ghogare), पोलीस अंमलदार सचिन इंगळे,
मोहम्मद रिजवान, राजू क्षीरसागर, प्रवीण बैरागी विनोद लोखंडे, जगदीश पवार, रवींद्र दळवी, सुनील राऊत, गजानन गाल्डे,
स्वाती वाणी यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Power of Investing | लवकर करोडपती बनायचंय?, गुंतवणुकीच्या या तीन सवयी फॉलो केल्याने पूर्ण होईल स्वप्न