ACB Trap On API Nalini Shinde | महिला डॉक्टर कडून 2 लाख रुपये लाच घेताना महिला सहायक पोलीस निरीक्षक (API) अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – ACB Trap On API Nalini Shinde | हॉस्पिटलमधील सोनोग्राफी सेंटर (Sonography Center) सील न करण्यासाठी महिला डॉक्टर कडून 2 लाखाची लाच घेताना (Accepting Bribe) महिला सहायक पोलीस निरीक्षकाला (Assistant Inspector of Police (API) पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB Trap On API Nalini Shinde) रंगेहात पकडले. नलिनी शंकर शिंदे (Nalini Shankar Shinde) असे लाच घेताना रंगेहात पकडलेल्या महिला पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. पुणे एसीबीने ही कारवाई निगडी येथे गुरुवारी (दि.30) केली.

 

याप्रकरणी 62 वर्षाच्या महिला डॉक्टर यांनी पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB Trap On API Nalini Shinde) तक्रार केली होती. तक्रारदार यांचे निगडी येथे हॉस्पिटल आहे. तर नलिनी शिंदे या सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक कार्यालयात (Sindhudurg Superintendent of Police) महिला अत्याचार निवारण कक्षात (Women’s Atrocities Prevention Room) सहायक पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत आहेत.

 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण पोलीस ठाण्यात (Malvan Police Station) बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (Prevention of Child Sexual Abuse Act) गुन्हा (FIR) दाखल आहे. या गुन्ह्यााचा तपास (Investigating Officer) नलिनी शिंदे यांच्याकडे आहे. या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी त्या निगडी (Nigdi) येथे आल्या होत्या. शिंदे यांनी तक्रारदार महिला डॉक्टर यांना हॉस्पिटलमधील सोनोग्राफी सेंटर सील न करण्यासाठी आणि गुन्ह्याच्या तपासात सहकार्य करण्यासाठी पाच लाखाची लाच मागितली. तडजोडीमध्ये 2 लाख रुपये देण्याचे ठरले होते. मात्र, तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी पुणे एसीबीकडे (Pune ACB) तक्रार केली.

प्राप्त तक्रारीची पडताळणी केली असता सहायक पोलीस निरीक्षक नलिनी शिंदे यांनी पाच लाख रुपये लाच मागून दोन लाख रुपये लाच स्विकारण्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार तक्रारदार यांच्या निगडी येथील हॉस्पिटलमध्ये आज सापळा रचण्यात आला.
तक्रारदार यांच्याकडून 2 लाख रुपये लाच स्विकारताना नलिनी शिंदे यांना रंगेहाथ पकडले.
नलिनी शिंदे यांच्याविरुद्ध निगडी पोलीस ठाण्यात (Nigdi police station)
भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार (Prevention of Corruption Act) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे (Pune ACB SP Rajesh Bansode),
अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव (Addl SP Suraj Gurav) यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे पथकाने केली.
पुढील तपास पोलीस निरीक्षक श्रीराम शिंदे (Police Inspector Shriram Shinde) करीत आहेत.

 

सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी,
असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या 1064 या हेल्प लाईन क्रमांकावर संपर्क साधावा.

 

Web Title :- ACB Trap On API Nalini Shinde | Assistant Inspector of Police (API) Nalini Shinde caught taking bribe of Rs 2 lakh from a female doctor pimpri chinchwad pune anti-corruption trap crime news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Changes From July 1 | क्रिप्टोकरन्सी, पॅन-आधार लिंक, प्लास्टिक बॅन आणि नवीन कामगार कायदा…जाणून घ्या 1 जुलैपासून होणार कोण-कोणते बदल

 

Eknath Shinde CM |  … म्हणून भाजपने एकनाथ शिंदेंच्या हाती दिली सत्तेची सूत्रं, ‘ही’ आहेत 4 कारणे

 

Gold Silver Price Today | सोने 51 हजारच्या खाली आले, चांदीत झाली मोठी घसरण, जाणून घ्या नवीन दर