ACB Trap On Police Havaldar | 30 हजाराच्या लाच प्रकरणी पोलिस अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – ACB Trap On Police Havaldar | 30 हजाराच्या लाचेची मागणी करून तडजोडीअंती 10 हजार रूपयाची लाच घेणार्‍या पोलिस हवालदारास अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने (Anti Corruption Bureau Maharashtra) रंगेहाथ पकडले आहे (Beed ACB Trap). त्यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरूध्द बीड जिल्ह्यातील वडवणी पोलिस स्टेशनमध्ये (Wadwani Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (ACB Trap On Police Havaldar)

 

पोलिस हवालदार रेवनाथ नायबा गंगावणे Revnath Naiba Gangawane (पद – पोलिस हवालदार, वडवणी पोलिस स्टेशन, जि. बीड) असे लाच घेणार्‍याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, यातील तक्रारदार व त्यांचे कुटुंबातील इतर तीन व्यक्ती यांचे विरुद्ध पोलीस ठाणे वडवणी येथे अदखलपात्र गुन्हा नोंद होता (Beed Bribe Case). सदर अदखलपात्र गुन्ह्यांमध्ये तक्रारदार व त्यांचे कुटुंबीयावरती कारवाई न करण्याकरिता व पोलीस ठाणे येथेच सदरचे प्रकरण मिटविण्याकरिता यातील आलोसे यांनी तक्रारदार यांचेकडे 30,000 रुपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती 10,000 रुपये लाच रक्कम लागलीच स्वीकारण्याचे मान्य करून पंच साक्षीदारा समक्ष 10,000 रुपये लाचेची रक्कम स्वीकारताना पकडण्यात आले आहे. (ACB Trap On Police Havaldar)

छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक संदीप आटोळे (SP Sandip Atole),
अप्पर पोलिस अधीक्षक विशाल खांबे (Addl SP Vishal Khambe)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप अधीक्षक सिध्दाराम म्हेत्रे (DySP Siddharam Mhetre),
पोलिस अंमलदार दिनकर उगलमुगले, अर्जुन मार्कड, विष्णु बेळे,
नागेश शेरकर आणि चालक करडे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

 

Web Title :  ACB Trap On Police Havaldar | Anti Corruption Bureau Arrest Revnath Naiba Gangawane In Bribe Case Wadwani Police Station

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime News | Gang spreads terror in Taljai area of Sahakar Nagar police station;
Vandalise 26 vehicles; Police apprehend notorious criminal Papulya Waghmare

ACB Trap News | Police constable walks into ACB net while accepting Rs 12,000 bribe