Microsoft ने लाँच केले नवीन फिचर ! ग्रुप मिटिंग अथवा संवादाला लगेच करू शकता ट्रान्सक्रिप्ट आणि ट्रान्सलेशन, जाणून घ्या कसे कराल ‘हे’ काम

नवी दिल्ली: मायक्रोसॉफ्ट त्यांच्या युजर्ससाठी एक खास फिचर आणले आहे. मायक्रोसॉफ्टचे इन- हौस गैरेज ट्रान्सक्रिप्शन अ‍ॅप लाँच करण्याची घोषणा केली आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून युजर्स मीटिंगमध्ये लगेच रियल टाइम ट्रान्सक्रिप्शन आणि ट्रान्सलेशन करू शकतील. सद्या हे अ‍ॅप फक्त ios युजर्सना उपलब्ध आहे. युजर्स फीडबॅकनंतर हे अ‍ॅप ऍन्ड्रॉइड मोबाईलमध्ये रोल आउट केले जाईल. हे अ‍ॅप गुगलच्या रेकॉर्डरला आणि Otter.ai ला चॅलेंज देणारे असेल. सद्या गुगल रेकॉर्डर फक्त पिक्सल फोनमध्ये चालते.

८० पेक्षा अधिक लोकल भाषेत भाषांतर करण्याची सुविधा
Microsoft चे असे म्हणणे आहे की, नवीन अ‍ॅप रियल टाइम, हाय क्वालिटीच्या ट्रान्सक्रिप्शन आणि ट्रान्सलेशनची सुविधा देईल. युजर्सना हे अ‍ॅप मिटिंग आणि संवादासाठी उपयोगी ठरणार आहे. कमी ऐकणाऱ्यांसाठी हे अ‍ॅप उपयोगी आहे. हे अ‍ॅप ८० पेक्षा जास्त आणि वेगवेगळ्या ठिकाणी बोलल्या जाणाऱ्या भाषेमध्ये रियल टाइम भाषांतर प्रदान करेल.

कंपनीच्या म्हणण्यानुसार, हे अ‍ॅप Al speech आणि language technology द्वारे चालवले जाईल. मीटिंगमध्ये वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक फोनच्या मायक्रोफोनच्या माध्यमातून कॅप्चर केलेल्या स्पीकरच्या क्वालिटीवर आधारित ऍक्युरंसी आणि स्पीकर ऍट्रिब्युशनसह मूव्ह करण्यासाठी सक्षम असेल.

जाणून घ्या, अ‍ॅपचा वापर कसा कराल
* अ‍ॅपचा उपयोग करण्यासाठी एक व्यक्ती आपल्या डिव्हाइसमध्ये मिटिंग सुरु करेल.
* यानंतर ब्ल्यूटुथच्या माध्यमातून मिटिंगमध्ये सहभागी होण्यासाठी अन्य लोकांना इन्व्हाईट करू शकता.
* इन्व्हाईट करण्यासाठी स्कॅनसाठी क्यूआर कोड अथवा लिंक दिली जाईल.
* मीटिंगमध्ये असलेल्या प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या डिव्हाइसमध्ये रियल टाइम ट्रान्सक्रिप्शन दिसेल. त्यामुळे मीटिंगमध्ये जे काही बोलले जाते ते सगळे तुमच्या समोर लिखित स्वरूपात येईल, त्यामुळे तुम्हाला सहज समजेल.