Acne Pigmentation | मुरूम-फुटकुळ्या ताबडतोब होतील क्लीन बोल्ड, 5 सिम्पल फॉर्म्युले करा फॉलो, गॅरंटीने होतील दूर

नवी दिल्ली : Acne Pigmentation | तरूणांसाठी चेहऱ्यावर पिंपल्स येणे ही चिंतेची बाब असते. त्वचेच्या वरच्या थरातील तैल ग्रंथीतून जास्त तेल बाहेर आल्याने ही समस्या होते. त्यात बॅक्टेरिया किंवा बुरशी आल्यास ती जास्त होते. मुरुमाची समस्या जलद दूर करायची असेल तर खालील फॉर्म्युले फॉलो करा (How To Get Rid Of Acne Pigmentation).

मुरुम नष्ट करणारे फॉर्म्युले

१. वर्कआउटनंतर लगेचच शॉवर घ्या –

व्होग या प्रसिद्ध मासिकानुसार, वर्कआउट केल्यावर किंवा जास्त घाम आल्यानंतर लगेच आंघोळ करा. यामुळे त्वचेतील घाण निघून जाईल. त्वचेच्या छिद्रांमध्ये ऑक्सिजन येत-जात राहील. घामाने भिजलेले सर्व कपडे स्वच्छ करा. वर्कआउट करताना घाम शोषणारे कपडे घाला.

२. मुरुम-फुटकुळ्या दाबू नका –

डॉ. क्लुक यांच्या म्हणण्यानुसार, कुठेही मुरुम असल्यास, ते दाबून कधीही पस काढू नका. असे केल्यास मुरुमांजवळ हजारो बॅक्टेरिया जमा होतील आणि सूज, जळजळ होईल. यामुळे चेहऱ्याच्या त्या भागात कायमचे डाग पडतील.

३. बेडशीट, पिलो कव्हर बदलत राहा –

बेडशीट आणि पिलो कव्हर बदलत रहा. या गोष्टींमध्ये बॅक्टेरिया असतात ज्यामुळे मुरुमांची समस्या आणखी वाढते.

४. सुगंधी नसलेल्या फेस वॉशने चेहरा स्वच्छ करा –

तज्ज्ञांच्या मते, सुगंध नसलेल्या फेसवॉशने चेहरा नियमितपणे स्वच्छ करा. बाहेर जाऊन आल्यावर चेहरा स्वच्छ करा.

५. ही क्रीम वापरा –

सेलिसायक्लिक अ‍ॅसिड असलेली क्रीम वापरा. मुरुमांवर ही क्रीम लावा. क्रीम लावण्यापूर्वी, मुरुम असलेला भाग स्वच्छ करा. त्रास जास्त असेल तर सेलिसायक्लिक अ‍ॅसिडसह मिथेनॉल आणि नियासिनॅमाइड असलेली क्रीम लावा. मात्र, समस्या जास्त होण्यापूर्वी, एकदा स्किन एक्सपर्टला अवश्य दाखवा. (Acne Pigmentation)

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Ganeshotsav 2023 | गणेशोत्सव चांगल्या व उत्साही वातावरणात साजरा करा, पुणे पोलिसांचे गणेश मंडळांना आवाहन