Video : आयुष्मान खुरानानं गल्ली क्रिकेट मध्ये लगावला जबरदस्त षटकार ! MS धोनीलाही वाटेल ‘हेवा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana) यानं गुरुवारी आपल्या चाहत्यांना त्याच्या क्रिकेट स्किलची झलक दाखवली. त्यानं एक व्हिडीओ शेअर केलाय ज्यात तो क्रिकेट खेळताना दिसत आहे. त्यानं षटकार लगावला आहे. व्हिडीओ शेअर करताना त्यानं खास कॅप्शनही दिलं आहे.

आयुष्माननं त्याच्या इंस्टावरून एक व्हिडीओ शेअर केल आहे. स्थानिक मुलांचा हा व्हिडीओ आहे. यात सर्व त्याला प्रोत्साहन देताना दिसत आहेत. तिथले जुनियर चीअरलिडर्स टाळ्या वाजवत स्माईल करत आयु्ष्मान आयुष्मान म्हणताना दिसत आहेत. या तो खास षटकार लगावताना दिसत आहे.

आयुष्मानचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. अनेकांनी यावर कमेंट करत प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. काहींनी हा व्हिडीओ शेअरही केला आहे. चाहत्यांची त्याच्या या स्किलचही कौतुक केलं आहे.

आयुष्मानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच तो अभिषेक कपूरचा चंडीगढ करे आशिकी सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात त्याच्या सोबत वाणी कपूर असणार आहे. इतकंच नाही तर तो डॉक्टर जी नावाच्या एका सिनेमातही दिसणार आहे. असं सांगितलं जात आहे की, या सिनेमात तो स्त्रीरोग तज्ज्ञाची भूमिका साकारणार आहे. आधी या सिनेमाचं नाव स्त्री रोग विभाग ठेवलं होतं, परंतु नंतर यात बदल करून डॉक्टर जी करण्यात आलं. काही दिवसांपूर्वीच तो गुलाबो सिताबो सिनेमात दिसला होता. या सिनेमात त्यानं बिग बी अमिताभ बच्चन सोबत काम केलं होतं. हा सिनेमा ओटीटीवर रिलीज झाला होता.