Actor Prabhas | आदिपुरुष चित्रपटाच्या अपयशाचा प्रभासच्या करिअरवर काहीही परिणाम नाही; पुढच्या चित्रपटासाठी घेतले करोडो रुपये

पोलीसनामा ऑनलाइन – बाहुबली फेम अभिनेता प्रभास (Actor Prabhas) हा त्याच्या नुकताच रिलिज झालेल्या आदिपुरुष चित्रपटामुळे चर्चेत आहे. प्रभू श्रीरामाची भूमिका साकारणाऱ्या प्रभासच्या या आदिपुरुष चित्रपटाकडून चाहत्यांना खूप अपेक्षा होत्या. मात्र प्रेक्षकांच्या अपेक्षांना ओम राऊत दिग्दर्शित ( Director Om Raut) आदिपुरुष चित्रपट खरा उतरला नाही. यावरून अभिनेता प्रभासला ही प्रेक्षकांच्या नाराजीला समोरे जावे लागले. अनेकांनी त्यांच्या अभिनयावर प्रश्न चिन्ह उपस्थित केले. मात्र आदिपुरुषच्या फ्लॉप होण्याचा प्रभासच्या करिअरवर काहीही परिणाम झालेला नाही. प्रभास पुढील चित्रपटाच्या तयारीला लागला असून त्याने पुढच्या चित्रपटासाठी कोट्यावधी रुपयांचे मानधन घेतले आहे.

दाक्षिणात्य अभिनेता प्रभास याने बाहुबली चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली होती. त्याच्या या चित्रपटामुळे तो प्रकाशझोतात आला. मात्र त्याचा आदिपुरुष चित्रपट फ्लॉप ठरला. त्यानंतर आता प्रभास पुढील चित्रपटाच्या तयारीस लागला आहे. त्याने केवीएन प्रोडक्शन्स (KVN Productions) या कन्नड़ प्रोडक्शन हाऊसची ऑफर स्वीकारली असून तो लवकरच त्यांच्या केडी-द डेव्हिल (KD-The Devil) या चित्रपटात झळकणार आहे. KGF फेम प्रशांत नील (Prashant Neil) निर्मित या चित्रपटाचे 500 करोडचे बिग बजेट असणार आहे. या चित्रपटासाठी फक्त प्रभासने 100 कोटी मानधन घेतले असल्याने एका वृत्तवाहिनीने सांगितले आहे.

प्रभास त्याच्या नवीन चित्रपटाच्या तयारीला लागला असून त्याच्याकडे अनेक एक्साईटेड आणि थरारक चित्रपटांच्या ऑफर आहेत. प्रभासच्या या आगामी चित्रपटात त्याच्यासोबत पृथ्वीराज सुकुमारन (Prithviraj Sukumaran), श्रुति हासन (Shruti Haasan) आणि जगपति बाबू (Jagapathi Babu) हे कलाकार मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहेत. हा चित्रपट अनेक भाषांमध्ये प्रदर्शित होणार असून तो RRR या सुपरहिट चित्रपटापेक्षा अधिक कमाई करेल अशी आशा निर्मात्यांना आहे.

अभिनेता प्रभास (Actor Prabhas) बाहुबली (Baahubali) या चित्रपटामुळे तो जागतिक स्तरावर ओळखला जाऊ लागला. त्याचा चाहता वर्ग फार मोठा असून त्याचे चाहते नेहमी त्याच्या आगामी चित्रपटाची वाट पाहत असतात. मात्र त्याच्या आदिपुरुष चित्रपटाने (Adipurush Film) लोकांच्या आस्थेवर घाला घातल्याने तो फ्लॉप ठरला. मात्र याचा प्रभासच्या कमाईवर व लोकप्रियेतेवर काहीही परिणाम झालेला नाही. प्रेक्षक आजही त्याच्या आगामी चित्रपटासाठी उत्सुक आहेत.

Web Title : Actor Prabhas | prabhash reportedly taking 100 cr fee for kd the devil even after adipurush failure

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Whimsical AI Artistry: Disney-Style Cartoon Portrayals of Maharashtra’s Political Leaders

Why You Need Your Own Health Insurance Even With Employee Coverage

Pune Crime News | हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते शरद मोहोळसह 7 जणांची अपहरण, खंडणी, जिवे मारण्याची धमकीच्या गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता

Pune Police Crime Branch | भवानी पेठेतून 10 लाख 50 हजाराचे अंमली पदार्थ जप्त, गुन्हे शाखेकडून एकाला अटक