Actress Jasmin Bhasin | लोकप्रिय अभिनेत्री जास्मिन भसीनने केला होता आत्महत्येचा प्रयत्न, ‘हे’ होते कारण

पोलीसनामा ऑनलाइन – छोट्या पडद्यावरील एक लोकप्रिय अभिनेत्री जास्मिन भसीन (Actress Jasmin Bhasin) ही टिव्हीविश्वातील प्रसिद्ध व्यक्ती आहे. तिने अनेक हिंदी मालिकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केले. त्यामुळे घराघरात ती पोहचली असून तिचा मोठा चाहता वर्ग आहे. लोकप्रिय अभिनेत्री आज लग्झरी आयुष्य जगत असली तरी एकेकाळी तिने (Actress Jasmin Bhasin) आत्महत्येचा प्रयत्न केला होता.

अभिनेत्री जास्मिन भसीन हिने मेहनतीने आपल्या मनोरंजन विश्वात नाव कमावले आहे. आज जास्मिन तिचा वाढदिवस साजरा करत आहे. तिचा जन्म 28 जून 1990 रोजी राजस्थानातील कोटा (Kota, Rajasthan) येथे झाला. तिचे शिक्षण ही तिथेच झाले. जास्मिन ही मध्यमवर्गीय शीख कुटुंबातून आली असून कॉलेजचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिने मॉडेलिंगला सुरुवात केली. त्यानंतर तिने आपला मोर्चा दाक्षिणात्य चित्रपटांकडे (South Movies) वळवला. तिथे तिने वानम(Vanam), वेता (Veta) यासारख्या चित्रपटातून भूमिका साकारली. मात्र तिने 2015 साली हिंदी मालिकांमधून काम करण्यास सुरुवात केली आणि तिचे नशीब बदलले. हा निर्णय तिच्यासाठी आणि करिअरसाठी महत्त्वाचा ठरला.

अभिनेत्री जास्मिन भसीनने ‘टशन-ए-इश्क’ (Tashan-e-Ishq) ही पहिली हिंदी मालिका केली. त्यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिले नाही. त्यानंतर तिने सिद्धार्थ शुक्ला (Siddharth Shukla) सोबत ‘दिल से दिल तक’ (Dil Se Dil Tak) या मालिकेत काम केले. यातील तिची भूमिका खूप गाजली. या मालिकेमुळे ती नावारूपाला आली. त्यानंतर तिने ‘दिल तो खुश है जी’ (Dil Toh Happy Hai Ji) या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारली. ती हिंदी बिग बॉसच्या 14 व्या (Bigg Boss Hindi 14) पर्वात झळकली होती. त्यानंतर तिने खतरों के खिलाडी (Khatron Ke Khiladi) या रिॲलिटी शोमध्ये सहभाग नोंदवला होता.

आत्ता लोकप्रियतेच्या आणि यशाच्या शिखरावर असलेल्या जस्मिनने धक्कादायक बाब सांगितले. तिने खतरों के खिलाडी सीजन 9 (Khatron Ke Khiladi Season 9) मध्ये सांगितले की तिने आत्महत्येचा (Jasmin Bhasin Suicide) प्रयत्न पूर्वी केला आहे. जस्मिन भसीनने स्ट्रगलिंगच्या काळात काम मिळत नव्हते म्हणून आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याचे कबुल केले. मात्र आता आयुष्यात पुढे आल्यावर तिने हि मोठी चूक केली होती असे मान्य केले आहे. आज जास्मिन (Actress Jasmin Bhasin) तिचा 33 वा वाढदिवस साजरा करत आहे.

Web Title :  Actor Prabhas | prabhash reportedly taking 100 cr fee for kd the devil even after adipurush failure

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Whimsical AI Artistry: Disney-Style Cartoon Portrayals of Maharashtra’s Political Leaders

Why You Need Your Own Health Insurance Even With Employee Coverage

Pune Crime News | हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते शरद मोहोळसह 7 जणांची अपहरण, खंडणी, जिवे मारण्याची धमकीच्या गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता

Pune Police Crime Branch | भवानी पेठेतून 10 लाख 50 हजाराचे अंमली पदार्थ जप्त, गुन्हे शाखेकडून एकाला अटक