Actress Alia Bhatt | अभिनेत्री आलिया भट्टच्या ‘या’ लूकवर नेटकरी फिदा

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलीवूडची एक सुपरस्टार अभिनेत्री म्हणजे आलिया भट्ट (Actress Alia Bhatt) ही आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे आणि चित्रपटामुळे चर्चेत असते. आलियाचा मोठा चाहता वर्ग असून ती अनेक वर्षे एकामागून एक हिट चित्रपट देत आहे. मध्यंतरी आलेल्या आलिया भट्टचा गंगूबाई काठियावाडी (Gangubai Kathiawadi) हा चित्रपट खूप गाजला होती. आलियाची या चित्रपटातील अक्टिंग तिच्यामधील अभिनय कौशल्याची ग्वाही देत होती. त्यानंतर आलियाने एका गोंडस मुलीला जन्म दिला असून त्यामुळे काही काळ तिने ब्रेक घेतला होता. आता मात्र आलिया पुन्हा एकदा जोमाने कामाला लागली असून तिने तिचे काही सुंदर फोटो सोशल मीडिययावर शेअर केले आहेत. अभिनेत्री आलिया भट्टचा हा लूक तिच्या चाहत्यांना फार आवडला आहे.

अभिनेत्री आलिया भट्ट ही नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मच्या एका इव्हेंटमध्ये सहभागी झाली होती. या कार्यक्रमादरम्यान आलियाने हिरव्या रंगाचा वन पीस परिधान केला होता. यामध्ये फोटोशुट केलेले फोटो आलियाने आपल्या ऑफिशियल अकाऊंटवर शेअर केले आहेत. या डिझानर ड्रेसमध्ये आलियाच्या लूकचे खूप कौतुक होत आहे. ग्रीन कलरचा ड्रेस आणि मोकळे केस असा लूक तिने केला होता. अनेक नेटकऱ्यांनी तिच्या या फोटो खाली कमेंट करुन तिचे कौतुक केले आहे. आलिया बाळाच्या जन्मानंतर पुन्हा एकदा फिट झालेली दिसत आहे.

अभिनेत्री आलिया भट्टने (Actress Alia Bhatt) 2012 साली स्टुडन्ट ऑफ द इयर या चित्रपटातून बॉलीवुडमध्ये पदार्पण केले. एका दशकाहून अधिक काळ तिने हे क्षेत्र गाजवले असून अनेक हिट चित्रपट दिले आहे. आलियाच्या भूमिका प्रेक्षकांना खूप भावल्या असून तिने स्वत: हक्काची जागा निर्माण केली आहे. तिच्या हायवे, डिअर जिंदगी, राझी आणि गंगूबाई काठियावाडी या चित्रपटातील भूमिका खूप गाजल्या आहेत. आलिया आता अभिनेता रणवीर सिंगसोबत रॉकी और रानी की प्रेम कहानी (Rocky Aur Rani Kii Prem Kahaani) या चित्रपटात स्क्रीन शेअर करणार आहे. आलियाने आरआरआर (RRR) चित्रपटातून दाक्षिणात्य सिनेमातून पदार्पण केले असून ती लवकरच हॉलीवूडमध्येही (Hollywood) झळकणार आहे. हार्ट ऑफ स्टोन (Heart of Stone) या हॉलीवूडपट मध्ये काम करणार आहे.

Web Title :  Actress Alia Bhatt | alia bhatt at netflixs tudum event share photo on social media

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा