Actress Gul Panag | नोटांवर लक्ष्मी-गणपतीच्या फोटोंबद्दल अभिनेत्रीचे परखड मत, म्हणाली – ‘सगळ्याच गोष्टींमध्ये धर्म आणण्याचा खेळ…’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Actress Gul Panag  | भारतीय चलनातील (Indian Currency) नव्या नोटांवर महात्मा गांधींचा (Mahatma Gandhi) फोटो तसाच ठेवत लक्ष्मी मातेचा आणि गणपतीचा फोटो सुद्धा छापावा, अशी मागणी आम आदमी पार्टीचे (Aam Aadmi Party) प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Delhi CM Arvind Kejriwal) यांनी काल केली होती. यावर अनेक उलट-सुलट प्रतिक्रिया येत आहेत. आम आदमी पक्षाकडून निवडणूक लढविणारी अभिनेत्री गुल पनाग (Actress Gul Panag) हिने केजरीवालांच्या मागणीवर परखड प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

गुल पनागने (Actress Gul Panag) केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, हा खरंच शेवट आहे की शेवटापर्यंत जाण्याचं माध्यम? सगळ्याच गोष्टींमध्ये धर्म आणण्याचा खेळ आता सगळेच खेळतील. फक्त राजकारणीच नाही! जे असहमत आहेत, त्यांनी राज्यघटना धुंडाळत राहा. पण त्याचा फारसा उपयोग होणार नाही.

दरम्यान, मुंबईतील भाजपा (Mumbai BJP) नेते राम कदम (Ram Kadam) यांनी तर नोटांवर थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), वीर सावरकर (Veer Savarkar) यांचे फोटो नोटांवर छापावेत, अशी मागणी केली. तर नितेश राणेंनी (Nitesh Rane) छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) फोटो छापण्याची मागणी केली आहे.

दिल्ली मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटले होते की, एका बाजूला गांधीजींचा फोटो आणि दुसर्‍या बाजूला लक्ष्मी आणि गणपतीचा फोटो असेल तर संपूर्ण देशाला त्यांचे आशीर्वाद मिळतील. लक्ष्मी जी भरभराट आणि समृद्धी आणतात तर गणपती सर्व अडथळे दूर करतात, त्यामुळे या दोघांचे फोटो नोटांवर छापण्यात यावे.

केजरीवाल यांनी केंद्राला आवाहन करताना म्हटले होते की, मी सर्व नोटा बदलण्याबाबत बोलत नाही,
परंतु ज्या नोटा नव्याने छापल्या जातील, त्यावर लक्ष्मी आणि गणपतीचे फोटो छापण्यात यावे.

Web Title :- Actress Gul Panag | actress gul panag rection on arvind kejriwal demand of lakshmi ganesh photos on notes

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Mumbai Police | 2 महिन्याच्या चिमुकलीचे फूटपाथवरुन अपहरण, मुंबई पोलिसांकडून 12 तासांत आरोपीला अटक; बाळ पुन्हा आईच्या कुशीत

MLA Bachchu Kadu | रवी राणा आणि बच्चू कडू यांनी समजुतीने घेतले पाहिजे – आ. श्रीकांत भारतीय