Actress Kangana Ranaut | कंगनाच्या बहुप्रतिक्षित ‘इमर्जन्सी’ चित्रपटाचा टीझर आऊट; इंदिरा गांधींच्या लुकमध्ये कंगनाला प्रेक्षकांची पसंती

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलीवुडची क्वीन अशी ओळख असलेली अभिनेत्री कंगना राणौत (Actress Kangana Ranaut) ही नेहमी अनोख्या भूमिका साकारताना दिसते. कंगना ही कायम तिच्या परखड वक्तव्यांमुळे चर्चेत असते आता कंगनाचा आगामी बहुप्रतिक्षित चित्रपटामुळे चर्चेत आहे. तिचा ‘इमर्जन्सी’ या (Emergency Movie) बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. कंगनाचे (Actress Kangana Ranaut) इंदिरा गांधींच्या लुकमध्ये फोटो व्हायरल झाले होते तेव्हापासून हा चित्रपट प्रतिक्षापंक्तीमध्ये आहे. आता कंगनाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन या चित्रपटाचा टीझर पोस्ट केला आहे. अवघ्या दोन तासांत या टीझरला लाखो व्ह्युज मिळत आहे. (Emergency Teaser Out)

चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. या टीझरमध्ये इमर्जन्सी घोषित करण्यात त्या दिवसाची तारीख (Emergency Day) पहिल्यांदा समोर येते. (Emergency In India) त्या काळातील माध्यामांवरील बंधन, लोकांचा विरोध, त्या विरोध करणाऱ्यांवर पोलिसांनी केलेला गोळीबार आणि एकूणच देशातील तणावपूर्ण वातावरण स्पष्टपणे मांडण्यात आले आहे. यामध्ये सर्वांत लक्षवेधी ठरत आहे कंगना राणौतने साकारलेली इंदिरा गांधींची (Indira Gandhi) हुबेहुब भूमिका. तिचा लूक आणि आवाज डोळ्यासमोर देशाच्या त्या पॉवरफुल लिडरचा चेहरा क्षणात समोर आणतो. टीझरमधील एक डायलॉग सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे तो म्हणजे, “या देशाची रक्षा करण्यापासून कुणीच मला थांबवू शकत नाही, कारण इंडिया इज इंदिरा अँड इंदिरा इज इंडिया.” (Indira Gandhi Emergency)

अभिनेत्री कंगना राणौत (Kangana Ranaut Emergency Movie) हिने ‘इमर्जन्सी’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून ती इंदिरा गांधींची प्रमुख भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटामध्ये 1973 साली लागू करण्यात आलेल्या ना भूतो ना भविष्यती अशा आणीबाणीचा कालखंड दाखवण्यात आला आहे. या आणीबाणीमध्ये देशात घडलेला हिंसाचार, त्या वेळेसची परिस्थिती आणि लोकभावना मांडण्यात येणार आहे. इमर्जन्सी’ चित्रपटामध्ये पडद्यामागील घटना, सामाजिक परिस्थिती मांडण्यात आली आहे. (Kangana As Indira Gandhi)

अवघ्या एका मिनिटांचा टीझर अंगावर शहारे आणत आहे. टीझरमुळे प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे. कंगनाने या चित्रपाटच्या दिग्दर्शनाचे काम केले आहे. त्याचबरोबर आता कंगना निर्मिती क्षेत्रातही उतरली असून तिच्या आगामी ‘टिकू वेड्स शेरु’ (Tiku Weds Sheru) या चित्रपटामुळेही चर्चेत आहे. यामध्ये अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी (Actors Nawazuddin Siddiqui) आणि अवनीत कौर (Avneet Kaur) मुख्य भूमिकेत आहेत.

Web Title : Actress Kangana Ranaut | kangana ranaut directorial most awaited emergency film teaser out

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा