Actress Rhea Chakraborty | सुशांतच्या मृत्यूनंतर गर्लफ्रेंड रियाने दिले चोख उत्तर, बोलणारे खड्ड्यात जा

पोलीसनामा ऑनलाइन – अभिनेता सुशांत सिंह राजपूतला जाऊन आता 3 वर्षे झाली. (Sushant Singh Rajput Suicide) यावेळी त्याची गर्लफ्रेंड अभिनेत्री रिया चक्रवर्ती (Actress Rhea Chakraborty) ही वादाच्या भोवऱ्यात अडकली होती. त्यावेळी रियाला सोशल मीडियावर खूप ट्रोल करण्यात आले होते. सुशांतच्या चाहत्यांनी त्याच्या मृत्यूसाठी गर्लफ्रेंड (Sushant Singh Rajput Girlfriend) रियाला दोषी मानले होते. सुशांतच्या मृत्यूनंतर तिला पोलीसांनी ट्रग्स प्रकरणी अटक केले होते. यानंतर जबरदस्त ट्रोल झालेल्या रियाने (Actress Rhea Chakraborty) आता मौन सोडले असून तिला बोल लावणाऱ्यांना तिने खडे बोल सुनावले आहे.

अभिनेत्री रिया चक्रवर्ती आता छोट्या पडद्यवरील प्रसिद्ध शो एमटीव्ही रोडिज (MTV Roadies) मध्ये सहभागी झाली आहे. एमटीव्ही रोडीज सीजन 19 (MTV Roadies Season 19) मध्ये रिया गॅंग लीडर म्हणून लेटेस्ट एपिसोडमध्ये झळकत आहे. याची छोटी व्हिडिओ तिने तिच्या ऑफिशियल इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यामध्ये ती बोलणाऱ्या लोकांना खड्ड्यात जा असे सांगत आहे. (Rhea Chakraborty Controversy)

या व्हिडिओमध्ये रिया टीम लीडर (MTV Roadies 19 Team Leader) असून ती म्हणाली आहे की, “मला सुद्धा खूप लोक खूप काही बोलले आहेत. अनेक लोकांनी मला वेगवेगळ्या नावांनी हिणवले आहे. पण त्यांची लेबल मी स्वीकारु का? या बोलणाऱ्या लोकांकडे लक्ष देण्याची काही गरज नाही. याचा आवाज ऐकण्याची गरज नसून आपल्या आतमध्ये जो आवाज आहे तो ऐकला पाहिजे. या लोकांमुळे मी आयुष्य जगणे थांबवावे का तर अजिबात नाही. खड्ड्यात जाऊ दे त्यांना…” अशा शब्दांत रियाने तिला ट्रोल करणाऱ्या लोकांना चोख प्रतिउत्तर दिले आहे.

अभिनेत्री रिया (Actress Rhea Chakraborty) सध्या एमटीव्ही रोडिज शो गाजवत असून अनेक प्रेक्षकांना तिचे विचार आवडत आहेत. मात्र सुरुवातीला खूप उलटसुलट प्रतिक्रिया येत होत्या. तिला काढून टाकावे अशी मागणी सोशल मीडियावर केली जात होती. तिची शोमध्ये प्रिन्स नरुला (Prince Narula) सोबत वाद देखील होत होते. पण दोघेही शो चा समान घटक असल्याने ती अजूनही शो मध्ये आहे. रियाने याआधी 2021 साली अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि इम्रान हाश्मी (Emraan Hashmi) यांच्यासोबत ‘चेहरे’ या चित्रपटात (Chehre Movie) स्क्रिन शेअर केली होती. आता ती एमटीव्ही रोडीज सीजन 19 गाजवत आहे.

Web Title :   Actress Rhea Chakraborty | riya chakrabortys response to being trolled after sushants death said who are they

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा