Adah Sharma | केरला स्टोरी फेम अभिनेत्री अदा शर्माची तब्येत ढासळली; हॉस्पिटलमध्ये तातडीने केले ॲडमिट

पोलीसनामा ऑनलाइन – ‘द केरला स्टोरी’ (The Kerala Story) या चित्रपटामुळे प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री अदा शर्मा (Adah Sharma) ही आता लोकप्रिय अभिनेत्री बनली आहे. मात्र सध्या तिची तब्येत ठीक नसल्याने तिला हॉस्पिटल मध्ये ॲडमिट (Adah Sharma Hospitalized) करण्यात आले आहे. अभिनेत्री अदा शर्मा हिची तब्येत खूपच ढासळ्याने तिला तातडीने ॲडमिट करण्यात आले आहे. तिच्या चाहत्य़ांना यामुळे धक्का बसला असून अनेकांनी सोशल मीडियावर तिची विचारपूस देखील केली आहे. अभिनेत्री अदा शर्मा (Adah Sharma) हिला स्ट्रेस असल्यामुळे तिची तब्येत खराब झाली असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे.

अभिनेत्री अदा शर्मा ही तिच्या ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटातील भूमिकेमुळे खूप गाजली. तिच्या भूमिका व सौंदर्य यावर अनेक चाहते घायाळ आहे. अदा शर्मा अनेकदा वेगवेगळ्या प्रकारची वक्तव्ये देखील करताना दिसून येते. अभिनेत्री अदा शर्मा ही लवकरच ‘कमांडो’ या वेबसिरिजमध्ये (Commando Web Series) झळकणार आहे. तिच्या या सिरिजच्या प्रमोशनसाठी ती इव्हेंटला निघाली होती. मात्र रस्त्यामध्ये तिची तब्येत खराब झाली. एका वाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार अदा ही आधीपासूनच स्ट्रेसमध्ये होती. तिला जुलाब देखील होत होते. ती अचानक आजारी पडल्यामुळे तात्काळ अदाला हॉस्पिटला नेण्यात आले. सध्या तिला डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. तिला डायरिया (Diarrhea) व फूड पॉइजनिंग (Food Poisoning) झाले असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे.

अभिनेत्री अदा शर्मा (Adah Sharma) ही बॉलीवुडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक बनली आहे. तिच्या अदांवर वर सौंदर्यावर चाहते फिदा आहे. अदा ही सोशल मीडियावर देखील सक्रिय असते. ती नेहमी तिचे नवनवीन फोटोशूट चाहत्यासोबत शेअर करत असते. सध्या ती हॉस्पिटलमध्ये असल्याने चाहते ती लवकर बरी व्हावे याकरिता प्रार्थना करत आहेत. लवकरच तिची कंमाडो ही वेबसिरीज प्रेक्षकांच्या भेटीला (Adah Sharma Upcoming Projects) येणार आहे. यामध्ये अदा सोबत अमित सियाल (Amit Sial,), तिग्मांशु धुलिया (Tigmanshu Dhulia) आणि मुकेश छाबरा (Mukesh Chhabra) हे कलाकार प्रमुख भूमिका साकारणार आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | कोथरूड परिसरात तलवार हातात घेवून दहशत निर्माण करणार्‍या
ओंकार कुडलेच्या मुसक्या आवळल्या (Video)