Pune Crime News | कोथरूड परिसरात तलवार हातात घेवून दहशत निर्माण करणार्‍या ओंकार कुडलेच्या मुसक्या आवळल्या (Video)

पवना डॅमजवळील डोंगरातून गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कुडलेला घेतलं ताब्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | मंगळवारी (दि. 1 ऑगस्ट 2023) कोथरूड परिसरात (Kothrud Police Station Limits) लावण्यात आलेल्या बॅनरवर फोटा लावला नाही म्हणून तलवार हवेत फिरवत परिसरात दहशत निर्माण करणार्‍या ओंकार उर्फ आबा शंकर कुडले (रा. सागर कॉलनी, कोथरूड आणि बावधन) याच्या गुन्हे शाखेच्या पोलिसांनी (Pune Police Crime Branch) पवना डॅमजवळील (Pavana Dam) डोंगराळ भागात जावून मुसक्या आवळल्या आहेत. त्याच्या साथीदाराला देखील पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. (Pune Crime News)

अशोक बाळकृष्ण कळजकर असं ताब्यात घेण्यात आलेल्या दुसर्‍या आरोपीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, मंगळवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास आरोपी ओंकार उर्फ आबा शंकर कुडले (Omkar Alias Aba Shankar Kudle) याने बॅनरवर त्याचा फोटो लावला नाही म्हणून चिडून जाऊन हातामध्ये तलवार घेऊन दहशत निर्माण करण्यास सुरूवात केली. (Pune Crime News)

त्यावेळी त्याच्या साथीदाराने त्याला मदत केली. कुडले आणि त्याच्या साथीदाराविरूध्द कोथरूड पोलिस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नासह अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. कुडले आणि त्याचा साथीदार त्यादिवशी पासून फरार होते. गुन्हे शाखेचे पोलिस कुडले आणि त्याच्या साथीदाराच्या मागावर होते. तो पवना डॅमजवळील डोंगराळ भागात असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती.

ओंकार कुडलेच्या मुसक्या आवळण्यासाठी स्वतः पोलिस उपायुक्त अमोल झेंडे (DCP Amol Zende), सहाय्यक पोलिस आयुक्त सतीश गोवेकर (ACP Satish Govekar) इतर सहकार्‍यांसह पवना डॅम परिसरात रवाना झाले. त्यांनी आणि पोलिस पथकाने कुडले आणि त्याच्या साथीदाराचा शोध घेवून त्यांच्या मुसक्या आवळल्या.

पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar),
सह पोलिस आयुक्त संदीप कर्णिक (IPS Sandeep Karnik),
अप्पर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे (DCP Ramnath Pokale)
यांच्या सुचनेप्रमाणे आणि पोलिस उपायुक्त अमोल झेंडे,
सहाय्यक पोलिस आयुक्त सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली
वरिष्ठ पोलिस निरीक्षक गणेश माने, सहाय्यक पोलिस निरीक्षक अभिजित पाटील,
पोलिस हवालदार शितल शिंदे, संजय आढारी, किरण ठवरे, विजय कांबळे,
प्रफुल्ल चव्हाण, राजेंद्र मारणे, पोलिस अंमलदार अशोक शेलार, अमोल वाडकर, वैभव रणपिसे, मनोज सांगळे, शंकर संपते, सचिन अहिवळे आणि पोलिस मित्र सुधीर सोनवणे यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे.सदरील गुन्हयाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस आयुक्त भिमराव टेळे (ACP Bhimrao Tele) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Bhumi Pednekar | “…सिनेमांतून मी स्वतःचा वारसा तयार करत आहे” भूमी पेडणेकरने
केल्या मनोरंजन विश्वाबद्दल भावना व्यक्त