Adarsh Shinde | ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ चित्रपटात महत्वाची भूमिका साकारणाऱ्या उत्कर्षसाठी आदर्श शिंदेनी लिहिली पोस्ट, म्हणाला….

पोलीसनामा ऑनलाईन : Adarsh Shinde | उत्कर्ष शिंदेने (Utkarsh shinde) त्याच्या अभिनयाने चाहत्यांच्या मनात एक जागा केली आहे. शिंदे घराण्याचे नाव गायनाच्या क्षेत्रात आवर्जून घेतलं जातं. त्याच घरातील एक सदस्याने सध्या त्याचे नशीब अभिनयात आजमावण्याचे ठरवले आहे. उत्कर्ष हा बिग बॉस (Bigg Boss) तीन मधून घराघरात पोहोचला होता. आता उत्कर्ष शिंदे महेश मांजरेकरांच्या (Mahesh Manjrekar) आगामी चित्रपटात ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ (Vedat Marathe Veer Daudale Saat) या चित्रपटात ‘सूर्याजी दांडकर’ यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. (Adarsh Shinde)

एकीकडे वेडात मराठे वीर दौडले सात या चित्रपटाच्या घोषणेनंतर हा चित्रपट वादाच्या भरात अडकला आहे. या चित्रपटात अक्षय कुमार (Akshya Kumar) छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारत आहे. तर प्रवीण तरडे (Pravin Tarade) सुद्धा एका मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाला सर्वत्र विरोध होत असतानाच आदर्श शिंदेने (Adarsh Shinde) उत्कर्ष शिंदे याचा पोस्टर शेअर करत आपल्या लाडक्या भावाचे तोंड भरून कौतुक केले आहे.

यावेळी आदर्श शिंदेने पोस्टर रिलीज करत असे म्हटले की, “हे पोस्टर शेअर करताना खूप आनंद होत आहे.
पोस्टर रिलीज होऊन वेळ झाला पण मी आज share करतोय.
@utkarshshindeofficial ही भुमिका साकारण्यासाठी जी मेहनत तू करतोयस ते बघुन खूप छान वाटतंय,
त्यासाठी तुझं विशेष कौतुक. दिवस रात्र ट्रेनिंग सुरु आहे त्यामुळे तुझं हे काम नक्किच उत्तम होईल याची खात्री आहे.
आम्हा प्रेक्षकांना “सूर्याजी दांडकर” तुझ्या रूपात बघायला मिळणार आहेत,
ही भुमिका तू जगणार आहेस आणि या भुमिकेतून तुला जे शिकायला मिळणार आहे याचा मला भरपूर आनंद आहे.
keep it up. आता हा सिनेमा थिएटर मधे जाऊन बघायची उत्सुकता वाढली आहे.
तुमच्या संपूर्ण टीमला खूप शुभेच्छा”. आदर्शच्या या पोस्ट खाली अनेक नेटकऱ्यांनी देखील उत्कर्षला शुभेच्छा
दिल्या आहेत. याआधी उत्कर्ष ज्ञानेश्वर माऊली या मालिकेत संत चोखामेळाची भूमिका साकारताना दिसला होता.
पेशाने डॉक्टर असलेला उत्कर्ष आता अभिनयात स्वतःची नशीब आजमावताना दिसणार आहे.

Web Title :-  Adarsh Shinde | adarsh shinde wrote special post for brother utkarsh shinde vedat marathe veer daudale saat

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune PMC News | पुणेकरांनो जाणून घ्या तुमच्या भागातील कोण-कोणत्या रस्त्यांची कामे होणार, महापालिकेने ५७ रस्त्यांच्या कामांच्या काढल्या निविदा

Pune NCP | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीत महाविकास आघाडी सर्व जागा लढविणार