‘…म्हणून करायचो नेहा कक्करसोबत फ्लर्ट’, आदित्य नारायणचा खुलासा

पोलीसनामा ऑनलाइन – फेमस सिंगर नेहा कक्कर (Neha Kakkar) आणि पंजाबी सिंगर रोहनप्रीत सिंग (Rohanpreet Singh) हे दि. 24 ऑक्टोबर (शनिवार) रोजी लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. दोघांच्या लग्नाचे काही फोटो आणि व्हिडिओ समोर आले होते, जे सोशलवर खूप व्हायरल झाले होते. काही दिवसांपूर्वीच नेहा आणि आदित्य नारायण (Aditya Narayan) यांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या. परंतु आता नेहा विवाहबद्ध झाली आहे, तर आदित्यदेखील प्रेयसीसोबत लग्न करणार आहे. आता मात्र या चर्चांवर आदित्यने भाष्य करत मौन सोडलं आहे.

कपिल शर्मा (Kapil Sharma) च्या शोमध्ये बोलताना त्यानं सांगितलं आहे की, तो नेहा सोबत फ्लर्टिंग का करायचा. तिच्या आणि त्याच्या अफेअरच्या चर्चा का रंगल्या होत्या हेही त्यानं सांगितलं आहे. आदित्य म्हणाला, मी फक्त नेहासोबत फ्लर्ट करायचो असं नाही. जेव्हा कधी मी शो होस्ट करत असतो तेव्हा मी परीक्षकांसोबत मुद्दाम फ्लर्ट करत असतो. त्यामुळं तिच्यासोबत फ्लर्ट करण्याचं खास असं काही कारण नव्हतं. मी असं सहज आणि नेहमी करत असतो. मी यापूर्वीही अल्का याज्ञिक यांच्यासोबत फ्लर्ट केलं होतं. परंतू माझे वडील मला ओरडले होते.

आदित्य इंडियन आयडल या शोचं सूत्रसंचालन करत होता, तर नेहा परीक्षक होती. याच काळात दोघांच्या अफेअरच्या चर्चांनी जोर धरला होता. आता नेहानं रोहनप्रीत सोबत लग्न केलंय आणि सर्व चर्चांना पूर्ण विराम दिला आहे. आदित्यनंही स्पष्ट केलंय की, नेहासोबत फ्लर्टिंग हा मस्करीचा भाग होता.