अदनान सामीच्या सहकाऱ्याना ‘ भारतीय कुत्रे ‘ म्हणून हिणवले

कुवेत :वृत्तसंस्था
लोकप्रिय गायक अदनान सामीने दावा केला आहे की कुवैत एअरपोर्ट इमिग्रेशनमध्ये त्यांच्या कर्मचाऱ्यांना चुकीची वागणूक देण्यात आली आणि त्यांना “भारतीय कुत्रे” म्हटले गेले. परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी या प्रकरणाची दखल घेतली.
अदनान आपल्या लाईव्ह परफॉर्मन्स साठी कुवेत ला गेले होते तेव्हा ही घटना घडल्याचे त्यांनी ट्विट द्वारे सांगितले.
‘आम्ही तुमच्या शहरात प्रेम घेऊन आलो होतो. आमच्या भारतीयांनी आम्हाला सन्मानाची वागणूक दिली, मात्र तुम्ही कोणताही पाठिंबा दिला नाहीत. कुवेत विमानतळावरील इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी विनाकारण माझ्या स्टाफला तुच्छ लेखलं आणि भारतीय कुत्रे म्हणून डिवचलं. भारतीया दूतावासाशी संपर्क करुनही काही फायदा झाला नाही. कुवेतींची इतक्या उद्धटपणे वागण्याची हिंमतच कशी झाली?’ असा संताप अदनानने ट्वीटमधून व्यक्त केला आहे.’

स्थानिक दूतावासांशी संपर्क करूनही मदत न मिळाल्यामुळे परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी स्वतः अदनान यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले. त्यानंतर काही वेळातच आपल्याला मदत मिळाल्याचे सांगत अदनान यांनी सुषमा स्वराज यांचे आभार मानले.

https://twitter.com/AdnanSamiLive/status/993186164180963328

https://twitter.com/AdnanSamiLive/status/993147114426380288