Adv Ujjwal Nikam | भाजपाचे धक्कातंत्र! ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ ॲड. उज्ज्वल निकम यांना उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी

मुंबई : Adv Ujjwal Nikam | उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून (Mumbai North Central Lok Sabha) भाजपाने (BJP) आपला उमेदवार जाहीर केला आहे. भाजपाने प्रसिद्ध वकील उज्ज्वल निकम यांना या मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे. ९३ चा बॉम्बस्फोट खटला तसेच मुंबईवर दहशतवादी हल्ला करणाऱ्या कसाबचा खटला असेल इत्यादी प्रकरणांत निकम यांनी सरकारची बाजू भक्कमपणे मांडल्याने या दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली होती.(Adv Ujjwal Nikam)

भाजपाचे राष्ट्रीय महासचिव आणि मुख्यालय प्रभारी अरूण सिंह यांनी प्रसिद्ध पत्रक काढून हा निर्णय कळवला आहे. या पत्रकात मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून उज्ज्वल देवराम निकम यांना उमेदवारी देण्यात आल्याचे जाहीर केले आहे.

दरम्यान, आता या मतदारसंघात काँग्रेसच्या वर्षा गायकवाड विरूद्ध भाजपाचे उज्ज्वल निकम अशी लढत होणार आहे.
याच मतदारसंघातून पूनम महाजन या २०१९ मध्ये मोठ्या मताधिक्क्याने निवडून आल्या होत्या.
पण त्यावेळी शिवसेना त्यांच्यासोबत होती. विशेष म्हणजे याच मतदारसंघात उद्धव ठाकरे यांचे मातोश्री निवासस्थान आहे.
या मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे प्राबल्य आहे.

यावेळी भाजपाने दिवंगत भाजपा नेते प्रमोद महाजन यांच्या कन्या पूनम महाजन यांना उमेदवारी देणे टाळले आहे.
महाजन ऐवजी आता निकम यांना उमेदवारी देत भाजपाने पुन्हा एकदा धक्कातंत्रांचा अवलंब केला आहे.

सध्यातरी या मतदारसंघातील राजकीय स्थिती पाहता विजय मिळवणे भाजपासाठी सोपे असणार नाही.
राजकारणात अनुभवी असलेल्या मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्याशी त्यांची लढत होणार आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Praniti Shinde On BJP | सत्ता असताना तीन वेळा उमेदवार का बदलला, प्रणिती शिंदे यांचा भाजपला सवाल

Ajit Pawar On Shriniwas Pawar | सख्खा भाऊ विरोधात का गेला, अजित पवारांनीच सांगून टाकलं श्रीनिवास पवार काय म्हणाले होते, तू बारामतीचा उमेदवार बदल, मी प्रचार करतो