Advocate Umeshchandra Yadav-Patil | प्रतिष्ठित व्यापारी गौतम हिरण अपहरणासह खून प्रकरण: ॲड. यादव विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्त

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – Advocate Umeshchandra Yadav – Patil | बेलापूर Belapur (ता. श्रीरामपूर – Shrirampur) येथील प्रतिष्ठित व्यापारी गौतम हिरण (Gautam Hiran) यांच्या अपहरण – खून प्रकरणी (Kidnapping And Murder Case) शासनातर्फे विशेष सरकारी वकील (Special Public Prosecutor) म्हणून मुंबईतील (Mumbai) ख्यातनाम फौजदारी वकील उमेशचंद्र यादव – पाटील (Advocate Umeshchandra Yadav – Patil) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याच्या विधी व न्याय विभागाने (State Department Of Law And Justice) हा आदेश जारी केला आहे.

 

एक मार्च रोजी गौतम हिरण यांचे श्रीरामपूरच्या भर व्यापारी पेठेतून पैशासाठी अपहरण करण्यात आले होते. त्यानंतर दि. 7 मार्च 2021 रोजी त्यांचा मृतदेह आढळून आला होता. त्यानंतर गौतम हिरण यांचा पैशासाठी अपहरण करून खून (Murder) केल्याचे स्पष्ट झाले होते.

यासंदर्भात,अखिल भारतीय जैन अल्पसंख्याक फेडरेशन, महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते, यांनी हे प्रकरण लावून धरले होते. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक, जिल्हा पोलिस प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तपास उपविभागीय अधिकारी संदीप मिटके (SDPO Sandeep Mitke) यांच्याकडे वर्ग करण्यात आला होता. त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी व स्थानिक पोलीस यांनी अल्पावधीतच गुन्हेगारांना जेरबंद केले. या प्रकरणात एकंदर पाच आरोपी असल्याचे निष्पन्न झाले आहे.

 

या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन गृह खात्याने अ‍ॅड. उमेशचंद्र यादव – पाटील यांच्या नियुक्तीचा आदेश आज जारी केला आहे.
अ‍ॅड यादव – पाटील (Advocate Umeshchandra Yadav-Patil) यांच्या नियुक्तीमुळे आरोपीना कठोरात कठोर शासन होईल,
असा आशावाद श्रीरामपुरातील व्यापारी वर्गातून व्यक्त केला जात आहे.

 

Web Title :- Advocate Umeshchandra Yadav-Patil | Reputed Businessman Gautam Hiran Kidnapping And Murder Case Adv. Umeshchandra Yadav-Patil appointed special public prosecutor

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा


LPG Gas Price Hike | एलपीजी सिलेंडरच्या दरात मोठी वाढ, 7 मार्चनंतर घरगुती गॅससाठी जादा पैसे मोजावे लागणार?

 

Gallbladder Stone | गॉलब्लॅडर स्टोनकडे दुर्लक्ष करू नका, घरगुती उपचाराने करू शकता ठिक; जाणून घ्या

 

Pune Crime | पुण्यात अडीच वर्षाच्या बालिकेवर अत्याचार, खून प्रकरणी संजय काटकरला फाशीची शिक्षा; पुणे कोर्टाने सुनावली शिक्षा