‘या’ कारणामुळे प्रदर्शित होणार नाही ‘मेंटल है क्या’ चित्रपटाचा ट्रेलर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बुधवार १९ जूनला एकता कपूर निर्मित राजकुमार राव आणि कंगना रनौत यांचा अभिनीत विवादास्पद चित्रपट ‘मेंटल है क्या’चा ट्रेलर प्रदर्शित होणार होता पण तो होऊ शकला नाही. चित्रपट निर्मात्यांनी याचा एक नवीन पोस्टर शेअर करुन पोस्ट लिहली की, कमिंग सून. हा चित्रपट २६ जून रोजी प्रदर्शित होणार आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १९ जूनला या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च करण्यासाठी निर्मात्यांनी सर्व तयारी केली होती. सध्या कंगना रनौत हिमाचलमध्ये सु्ट्ट्या एन्जॉय करत आहे. तिला ही या इव्हेंटमध्ये सहभागी व्हायचे होते पण ऐनवेळी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्याचे रद्द झाले.

असे समजले होते की, या चित्रपटाला अनेकांनी विरोध केला. ज्यामुळे ट्रेलरची प्रदर्शित होण्याची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. डॉक्टरांनी देखील या चित्रपटाच्या टायटलवर विरोध केला आहे. निर्मात्यांनी निवेदन केले आहे की, पहिले ट्रेलर आणि चित्रपट पहा मग तुमचा निर्णय सांगा. चित्रपट आणि त्याच्या नावावर अनेकजण विरोध करत आहे. अशामध्ये निर्माते सेंसर बोर्ड कडून सर्टिफिकेट मिळण्याची वाट पाहत आहे. यानंतर चित्रपट आणि त्याचा ट्रेलर लॉन्च केला जाईल.

आरोग्यविषयक वृत्त –
तेजस्वी डोळ्यांसाठी गुणकारी औषधी वनस्पतींचा वापर

दुधी भोपळ्याची भाजी खाल्ल्यास दूर पळतील अनेक आजार

प्राचीन ग्रंथांमध्ये सूखी वैवाहिक जीवनासाठी सेक्ससंबंधी शास्त्रीय माहिती