दिल्ली ‘काबिज’ केल्यानंतर आता केजरीवालांची ‘नजर’ पंजाब आणि गोव्यावर, ‘या’ 2 दिग्गजांना दिली जबाबदारी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आम आदमी पार्टीने (आप) शुक्रवारी आपले आमदार आतिशी आणि जरनैल सिंह यांना क्रमश: गोवा आणि पंजाबमध्ये पक्षाचे प्रभारी म्हणून नियुक्त केले आहे. पक्षाने सांगितले की या दोन्ही राज्यात ते संघटना तयार करण्याची प्रक्रिया सुरु करतील. दिल्ली विधानसभा निवडणूकीत मोठा विजय मिळवल्यानंतर पक्षाने लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी राष्ट्रव्यापी अभियानाला सुरु केले आहे.

आपला दिल्लीत मोठा जनादेश मिळाला. मागील 5 वर्षात आपने दिल्लीत जनतेसाठी केलेले विकास कार्य, यामुळे जनता आनंदी असल्याचे दिसले, त्याचेच फळ आपला यंदाच्या विधानसभा निवडणूकीत मिळाले.

दिल्लीत आपने जे विकासाचे मॉडल तयार केले त्यामुळे जनता संतुष्ट आहे. दिल्लीत जनतेने त्यांना दिलेले हे समर्थन पाहता दिल्लीत केजरीवाल सरकार द्वारे जी सुविधा देण्यात येते, ती फक्त दिल्लीतील जनतेलाच नाही तर देशभरातील लोकांना आपल्या राज्यात हवी असे वाटते.

आपने जारी केला हेल्पलाइन नंबर –
याच विचाराने सरकारने पक्षाच्या विस्तारासाठी 98710 10101 हा हेल्पलाइन नंबर सुरु केला आहे. ज्या द्वारे देशभरातील लोक पक्षांशी जोडल्या जाऊ शकतील. विशेष म्हणजे फक्त काही दिवसात जवळपास 16 लाख पेक्षा जास्त लोकांनी या नंबरवर मिस कॉल देऊन आपला आपले समर्थन दिले आहे. पक्षाचा पुढील विस्तार पाहता पक्षाने आमदार आतिशी यांना गोवा राज्याचे तर जरनैल सिंह यांना पंजाब राज्याचे प्रभारी केले आहे.