… तर 30 सप्टेंबर नंतर तुमचं PAN कार्ड ‘बाद’ होईल, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आधार कार्ड आणि पॅनकार्ड एकमेकांशी लिंक करण्याची शेवटची तारीख जवळ येत आहे. यामुळे तुम्ही 30 सप्टेंबर 2019 पूर्वी हि प्रक्रिया पूर्ण करून घ्यायला हवी. असे केलं नाही तर तुमच्या पॅनकार्डला बाद केले जाणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर हि प्रक्रिया पूर्ण करून घ्या. आज आम्ही तुम्हाला याच बद्दल अधिक माहिती देणार आहोत.

या पद्धतीने आधार आणि पॅन करा लिंक

1) यासाठी तुम्हाला सर्वात आधी आयकर विभागाच्या ई-फाइलिंग वेबसाइटवर जावे लागेल.

2) डाव्या बाजूला तुम्हाला आधार कार्ड लिंक करण्याचा पर्याय दिला आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही त्यावर तुमचा आधार आणि पॅन क्रमांक टाकू शकता. त्यानंतर तेथे असलेला कॅप्चा तुम्ही भरायचा आहे.

3) आधार लिंक या पर्यायावर क्लिक केल्यानंतर नवीन पेज उघडले जाईल. त्यानंतर तेथे आपला आधार आणि पॅनकार्ड क्रमांक टाकून सबमिट केल्यानंतर दुसरे पेज उघडले जाईल.

4) येथील हायपरलिंकवर जाऊन तुम्हाला पुन्हा एकदा आधार क्रमांक आणि पॅनकार्ड क्रमांक टाकायचा आहे. त्यानंतर  ‘व्यू लिंक आधार स्टेटस’वर क्लिक करायचे आहे.

5) यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमची प्रक्रिया पूर्ण झाले आहे कि  नाही आणि आधार आणि पॅनकार्ड लिंक झाले आहे कि नाही याची पूर्ण माहिती मिळणार आहे.

Visit : policenama.com