Deepika Padukone Doll : ‘तैमूर’नंतर आता बाजारात आली दीपिका पादुकोणची ‘डॉल’, दिसला ‘असा’ अवतार

पोलीसनामा ऑनलाइन टीम : तुम्हाला माहितीच आहे की, करीना कपूर आणि सैफ अली खान यांच्या लाडक्या तैमूरची लोकप्रियता एवढी वाढली होती की बाजारात तैमूर डॉल विक्रीसाठी आली होती. असंच काहीसं झालं आहे. एका बॉलिवूड स्टारची डॉल सध्या बाजारात विक्रीसाठी आली आहे.

ज्या बॉलिवूड स्टारची बाहुली बाजारात विक्रीसाठी आली आहे, तिचं नाव आहे दीपिका पादुकोण. 2017 साली आलेल्या पद्मावत या सिनेमात दीपिकानं राणी पद्मावतीची भूमिका साकारली होती. दीपिकाची भूमिका साऱ्यांनाच आवडली होती. दीपिकाच्या याच लुकमधील बाहुली आता विक्रीसाठी आली आहे.

दीपिकाचा पद्मावत सिनेमात ज्याप्रमाणे लुक होता, भांगेत कुंकू,गळ्यात राणी हार, हाातात फुलं, बांगड्या अगदीच तसाच लुक दीपिकाच्या या डॉलसाठी करण्यात आला आहे. बाहुलीनंही डोक्यावर पदर घेतला आहे. खूप क्युट अशी ही बाहुली आहे. दीपिकाच्या या लुकमधील या डॉलचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. चाहत्यांनाही ही डॉल खूप आवडली आहे.

दीपिकाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर काही दिवसांपूर्वीच तिचा छपाक सिनेमा रिलीज झाला आहे. लवकरच ती पती रणवीर सिंगसोबत ’83’ या सिनेमात दिसणार आहे. कपिल देव यांची पत्नी रोमी भाटीया यांचा रोल ती साकारत आहे. रणवीर सिंगनं कपिल देवची भूमिका साकारली आहे. याशिवाय ती शकुन बत्राच्या अनाम या सिनेमातही दिसणार आहे.