‘माझ्या सूनेचे इरफान पठाणसोबत अनैतिक संबंध’, ज्येष्ठ दाम्पत्याचा आरोप; आत्महत्या करण्याची दिली धमकी, जाणून घ्या प्रकरण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   माजी क्रिकेटर इरफान पठाण याचे सूनेशी अनैतिक संबंध असल्याचा गंभीर आरोप अहमदाबाद पोलिस दलातून निवृत्त झालेल्या एका ज्येष्ठ व्यक्तीने केला आहे. याबाबतचा एक व्हिडिओही शेअर करण्यात आला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तसेच इरफान पठाण त्याच्या नावाचा वापर करून त्यांच्या मुलाला धमकावत आहे, असेही यामध्ये म्हटले आहे.

सय्यद इब्राहिम असे त्या वृद्धाचे नाव आहे. त्यांनी हा गंभीर आरोप केला आहे. इब्राहिम यांनी पोलिस ठाण्यात येऊन आत्महत्या करण्याची धमकी दिली आहे. त्यानंतर पोलिसांनी इब्राहिम आणि त्यांच्या पत्नीविरोधात पोलिस ठाण्यात येऊन आत्महत्येची धमकी दिल्याने एफआयआर दाखल केली आहे. तसेच दैनिक भास्करने दिलेल्या वृत्तानुसार, इब्राहिम यांच्या सुनेने 11 मार्च, 2021 ला त्यांच्या पूर्ण कुटुंबाविरोधात हुंडा मागितल्याची तक्रार दिली. त्याप्रकरणावर पोलिसांकडून तपास सुरु करण्यात आला आहे. त्यावर इब्राहिम यांनी आपल्याला खोट्या प्रकरणात अडकवले जात आहे. माझ्या सुनेचे इरफान पठाणसोबत अनैतिक संबंध आहेत, असे म्हटले आहे.

तसेच इब्राहिम यांचा मुलगा सय्यद याने दिलेल्या माहितीनुसार, इरफान आणि माझ्या पत्नीचे लग्नापूर्वीच अनैतिक संबंध होते. माझी पत्नी इरफान पठाणची चुलत बहिण लागते. ते दोघे एकमेकांना अनेक दिवसांपासून ओळखतात. इरफान पठाण माझ्या पत्नीला गुपचूप फिरायलाही नेत होता. ते दोघेही व्हिडिओ कॉलवर नेहमी बोलत असतात, असे सांगितले आहे.