Ahmednagar News | शिवरायांचा अवमान करणारा श्रीपाद छिंदम ‘गोत्यात’; फॉरेन्सिक रिपोर्टमधून आली ‘ही’ माहिती समोर

अहमदनगर न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  Ahmednagar News | छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी अहमदनगरचा (Ahmednagar News) माजी उपमहापौर श्रीपाद शंकर छिंदम (Shripad Shankar Chhindam) याच्या विरोधात सोमवारी कोर्टात (Court) दोषारोपपत्र (Indictment) दाखल करण्यात आले आहे. प्रसारित झालेल्या ऑडिओ क्लीपमधील (Audio clip) आवाज हा श्रीपाद छिंदम यांचाच असल्याचा फॉरेन्सिक लॅबचा रिपोर्ट (Forensic Lab Report) आणि 6 साक्षीदारांचे जबाब यांचा दोषारोपत्रात समावेश आहे.

पोलिसांनी तपासात ऑडिओ क्लिप आणि श्रीपाद छिंदम (Shripad Shankar Chhindam) याच्या आवाजाचे नमुने घेऊन फॉरेन्सिक लॅबला पाठविले होते. त्याचा रिपोर्ट देखील मिळाला आहे.
तो पुरावा पोलिसांनी दोषारोपपत्रा बरोबर जोडला आहे.
याशिवाय इतर 6 साक्षीदारांचे जबाबही नोंदविण्यात आलेत.
अहमदनगरच्या कोर्टात (Ahmednagar Court) या प्रकरणावरील सुनावणी लवकरच होणार आहे.
श्रीपाद छिंदम सध्या जामिनावर मुक्त आहे.
मागील काही दिवसांपूर्वीच त्याच्याविरुद्ध दिल्लीगेट येथील गाळ्यांच्या प्रकरणातून जातीवाचक शिवीगाळ केल्याचा गुन्हा देखील दाखल झालेला आहे.

दरम्यान, तोफखाना पोलीस ठाण्यातील (tofkhana Police Station) सहायक पोलीस निरीक्षक (तपास अधिकारी) किरण सुरसे (API Kiran Surase) यांनी हे 60 पानांचे दोषारोपपत्र आज (सोमवारी) नगरच्या कोर्टात (Ahmednagar Court) दाखल केले आहे.
फेब्रुवारी 2018 रोजी हा गुन्हा घडला होता. गुन्हा घडला तेव्हा श्रीपाद छिंदम उपमहापौरपदावर होता.
म्हणून त्याच्याविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी गृहविभागाची परवानगी हवी असते.
ती मिळविण्याची काही काळ प्रक्रिया नुकतीच पूर्ण झाली. नंतर, लगेचच हे दोषारोपपत्र दाखल केले आहे.

या दरम्यान, बांधकाम विभागाचे कर्मचारी अशोक बिडवे (Ashok Bidwe) यांच्याशी दूरध्वनीवरून बोलताना छिंदम याने शिवरायांबद्दल अपशब्द उच्चारले होते.
श्रीपाद छिंदम उपमहापौर असल्याने त्यांनी बिडवे यांना फोन करून एक काम सांगितले.
परंतु, त्यावेळी शिवजयंती जवळ आली होती.
म्हणून महापालिकेची संबंधित यंत्रणा त्या तयारीत असून ते काम झाले की, तुमचे करतो, असे बिडवे फोनवर श्रीप[द छिंदमला सांगत होते.
दरम्यान, श्रीपाद छिंदम हे एकदम संतापून शिवरायांबद्दल गलिच्छ भाषा वापरली.
बिडवे यांनाही शिवीगाळ केली. यासंदर्भात सवांद झालेला ही ऑडिओ क्लिप नंतर प्रसारित झाली आहे. याप्रकरणी शिवसेनेचे शहरप्रमुख दिलीप सातपुते (Dilip Satpute) यांनी फिर्याद दिली होती.
यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल झालेला आहे.

Web Title : Ahmednagar News | derogatory comment on shivaji maharaj chargesheet filed against shripad chindam

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Gold Price Today | चांदीमध्ये 1223 रूपयांची मोठी ‘घसरण’ अन् सोनं देखील झालं ‘स्वस्त’, जाणून घ्या आजचा 10 ग्रॅमचा भाव

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 179 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

NIMI Recruitment 2021 । नॅशनल इंस्ट्रक्शनल मीडिया इन्स्टिटयूटमध्ये होणार पदभरती, 35 ते 45 हजारांपर्यंत पगार