वायुसेनेच्या विमानाला अपघात

 नवी दिल्ली : वृत्तसंस्था 

उत्तर प्रदेशच्या बागपतमध्ये शुक्रवारी मोठा अपघात घडता घडता राहिलाय. इथे वायुसेना दिवसाची तयारी सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून वायुसेनेच्या एम एल १३० या छोट्या विमानाचा अपघात झालाय. उड्डाण घेतानाच घडलेल्या या अपघातात दोन पायलटने पॅराशूटच्या मदतीने उडी घेत आपला जीव वाचवला.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’628900ff-c873-11e8-89b3-c7b6834651d8′]

ही घटना बागपतच्या बिनौली भागातील रंछाडच्या जंगलात शुक्रवारी सकाळी पावणे दहा वाजता घडली. या घटनेत दोन्ही पायलट सुरक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघाताचे नेमके कारण मात्र अद्याप समजू शकलेले नाही. दुर्घटनाग्रस्त विमान दोन आसनी आहे. सकाळी अचानक जंगलात दोन आसनी विमान पडताना पाहताना स्थानिक घाबरले.

शिवशाही बसचा अपघात ; कंडक्टर ठार, १९ जखमी

विमान कोसळल्याची माहिती मिळाल्यानंतर प्रशासन तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर तातडीने बचावकार्य सुरू झाले.

दरवर्षी वायुसेना दिवस साजरा करण्यात येतो. या दिवसाच्या तयारीचा भाग म्हणून प्रात्याक्षिके करण्यात येत होती. त्यासाठी छोट्या विमानाने आकाशात भरारी घेतली. त्यानंतर काही वेळातच विमानात बिघाड झाला व ते वेगाने खाली येऊन लागले, हे पाहून दोघा पायलटांनी पॅराशुटचा वापर करुन आपली सुटका करुन घेतली. विमान एका उसाच्या शेतात कोसळले. ते पाहून गावकऱ्यांनी त्या ठिकाणी एकच गर्दी केली.