आता कार्डाशिवाय एटीएममधून पैसे काढता येणार

नवी दिल्ली :

आता तुम्हाला एटीएम कार्डाशिवाय एटीएममधून पैसे काढता येणार आहेत. एअरटेलने ही अनोखी सुविधा दिली असून सुरुवातीला देशातील काही मोजक्याच एटीएमवर ही सुविधा राहणार आहे.

इन्स्टंट मनी ट्रान्स्फर (आयएमटी) च्या माध्यमातून एअरटेलच्या ग्राहकांना पैसे काढता येणार आहेत.एअरटेल पेमेंट्स बँकेच्या खातेधारकांना सध्या आयएमटी प्रणाली असलेल्या एटीएममधून पैसे काढता येणार आहेत. सध्या २० हजार एटीएम मध्ये ही सुविधा उपलब्ध असेल . वर्षअखेरीस या एटीएमची संख्या १ लाखापर्यंत नेण्यात येणार असल्याचं एअरटेलने स्पष्ट केलं. त्यामुळे ग्राहकांना या नव्या सुविधेचा लाभ होणार आहे.

राज्यात जून महिन्यात तब्बल १२६१ बालकांचा मृत्यू

इन्स्टंट मनी ट्रान्स्फर (आयएमटी) –

इन्स्टंट मनी ट्रान्स्फर हे जगातील सर्वात मोठं कार्डलेस एटीएम आहे. यात सुरक्षित आणि सुलभ घरगुती पैसे हस्तांतरण रोख पैसे काढण्याची सुविधा आहे. आयएमटी सुविधेत ग्राहकांना मोबाइल नंबर आणि गुप्त कोड वापरून पैसे काढता येतील. फक्त प्राप्तकर्त्याचा मोबाइल नंबर, प्रेषित रक्कम आणि प्रेषकचा कोड सेट करणे आवश्यक आहे.

[amazon_link asins=’B01DEWVZ2C,B01MCUSD3L’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’a4f7b690-b277-11e8-a994-a50612d348e6′]