Ajit Pawar In Baramati Lok Sabha | बारामतीमध्ये अजित पवारांच्या सभेत तावरेंची उपस्थिती, 15 वर्षानंतर एकत्र आले

बारामती : पोलीसनामा ऑनलाईन – Ajit Pawar In Baramati Lok Sabha | अजित पवार यांनी सुनेत्रा पवार (Sunetra Ajit Pawar) यांच्या प्रचारासाठी बारामतीच्या सांगवीमध्ये कार्यकर्ता मेळावा घेतला. सांगवी हा तावरेंचा बालेकिल्ला आहे. या सभेसाठी सांगवीत अजित पवार, माळेगावचे माजी अध्यक्ष चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे हे पंधरा वर्षानंतर एकत्र आले होते. या सभेत अजित पवारांनी जोरदार फटकेबाजी केली.(Ajit Pawar In Baramati Lok Sabha)

अजित पवारांनी सभेमध्ये पन्नास वर्षाचा सर्व इतिहास मांडत शरद पवारांवर निशाणा साधला. पवार कुटुंबातील अनेक मुद्द्यांवर त्यांनी प्रहार केले. या सभेत चंद्रराव तावरे बोलले नाहीत, हा चर्चेचा विषय होणार हे माहित असल्याने अजित पवार यांनी आपल्या भाषणात स्पष्टीकरण सुद्धा दिले.

अजित पवार म्हणाले, उद्या लगेचच ब्रेकिंग न्यूज होईल, चंद्रराव अण्णांना सभेत बोलू दिले नाही. परंतु अण्णांना उन्हाचा त्रास झाला असल्यामुळे अण्णांनीच तशी सूचना केली होती. त्यामुळे मी बोलायला उठलो.

या सभेच्या निमित्ताने अजित पवार यांनी एका दगडात अनेक पक्षी मारल्याची चर्चा सध्या सुरू आहे.
कारण, अजित पवारांनी चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे यांच्या समवेत सभा घेतली. तसेच चंद्रराव तावरे यांच्या घरी भेट दिली.

काही दिवसांपूर्वी शरद पवार हे चंद्रराव तावरे यांच्या घरी गेले होते, त्यावेळी मोठी चर्चा झाली होती.
त्यावेळी या दोन नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा देखील झाली होती.
या भेटीवरून राजकीय वर्तुळात विविध प्रकारची चर्चा सुरू होती.
त्यानंतर आज अजित पवार यांनी थेट चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे यांच्यासमवेत सांगवीत सभा घेतली.
शिवाय ते चंद्रराव तावरे यांच्या घरी देखील गेले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sinhagad Raod Pune Crime | पुणे : सिंहगड रोड परिसरातील बंगल्यात 44 लाखांची घरफोडी

Ajit Pawar On Supriya Sule | अजित पवारांनी नाव न घेता लेकीला मतदान न करण्याचे केले आवाहन, म्हणाले माहेरी आलेल्या लेकीला साडीचोळी करा पण…

Amol Kolhe On Ajit Pawar | शिरुरची जनता तुम्हाला उत्तर दिल्याशिवाय शांत बसणार नाही ! डॉ. अमोल कोल्हे यांचं अजित पवारांना सडेतोड उत्तर