Ajit Pawar On Supriya Sule | अजित पवारांनी नाव न घेता लेकीला मतदान न करण्याचे केले आवाहन, म्हणाले माहेरी आलेल्या लेकीला साडीचोळी करा पण…

बारामती : Ajit Pawar On Supriya Sule | मुलगी घरी आल्यानंतर आई काय म्हणते, ये पोरी दहा-पाच दिवस रहा. नणंद भावजय चांगल्या मिळून-मिसळून रहा. त्यानंतर आईच लेकीला आणि जावयाला पोशाख करुन सासरी पाठवते. मुलगी माहेरची तर असतेच मात्र सासरची लक्ष्मी असते, लेकीला साडीचोळी करा, पण बटण दाबण्याच्या भानगडीत पडू नका, असे म्हणत अजित पवार यांनी अप्रत्यक्षपणे सुप्रिया सुळे यांना मत देऊ नका, असे आवाहन उपस्थितांना केले. (Baramati Lok Sabha)

बारामती तालुक्यातील शिर्सुफळ गावात आयोजित प्रचारसभेत उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. यावेळी अजित पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर निशाणा साधला. शरद पवारांनी सुनेत्रा पवारांचा बाहेरचे पवार असा उल्लेख केला होता. त्याला पुन्हा एकदा अजित पवारांनी प्रत्युत्तर दिले.(Ajit Pawar On Supriya Sule)

अजित पवार म्हणाले, अनेक ठिकाणी एखादी मुलगी सून म्हणून घरात येते तेव्हा ती घरची होते. आमच्यात मात्र चाळीस वर्षे झाले तरी ती बाहेरची सून असते. सुनेला मान असतो, तिला लक्ष्मी म्हटले जाते, सून घरात आल्यावर सासू सूनेच्याच हातात चाव्या देते ना.

चुकल तर जरुर सांगा, आईच्या पोटातून कोणीच शिकून येत नाही, मलाही बोलता येत नव्हतच ना,
पण संधी मिळाली की सोनं करुन दाखवलच ना. तसंच यंदा सुनेला मतदान करा, असे आवाहन अजित पवार यांनी केले.

अजित पवार म्हणाले, विरोधी पक्षाचा खासदार गेले दहा वर्षे होता, मात्र काहीच काम करू शकला नाही.
तुम्ही कोणाच्याही दबावाला बळी पडू नका, घाबरू नका. सात तारखेनंतर तुम्ही आणि मीच आहे.
बाकीचे सगळे परदेशात फिरायला जातील. चांगल्या वाईट काळामध्ये आपणच एकमेकांना साथ देणार आहोत.

शरद पवारांवर टीकास्त्र सोडताना अजित पवार म्हणाले, येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये २८८ आमदार असणार आहेत
९६ महिला आमदार देखील निवडून जाणार आहेत. महिलांना जो मानसन्मान मिळवून दिलेला आहे तो मोदी सरकारने
दिला आहे आणि इकडे सुनेला अशी वागणूक मिळत आहे. महिलांचा अपमान केला जात आहे.

अजित पवार म्हणाले, आम्ही निवडणूक आयोगाला विनंती करणार आहोत की, निवडणुकीच्या दिवशी कामगारांना सुट्टी जाहीर
करावी. सुट्टी दिली तर कामगारांना मतदानाचा अधिकार बजावता येईल. कोणीही मतदानापासून वंचित राहणार नाही.
एक एक मत महत्वाचे असते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Varunraj Bhide Journalism Award | सध्या व्यवस्थेविरुद्ध लिहिणाऱ्या पत्रकाराला देशद्रोही म्हटले जातेय, हे लोकशाहीला लांच्छनास्पद : अनंत बागाईतकर

Ajit Pawar Vs Sharad Pawar | शरद पवार एका बाजूला आणि संपूर्ण पवार कुटुंब एका बाजूला, अशीही झाली होती एक निवडणूक, अजित पवारांनी सांगितला जुना किस्सा