Ajit Pawar In Satara | … तर पवारांची औलाद नाही, अजित पवारांकडून आणखी एका नेत्याला खासदार बनवण्याचा शब्द

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – Ajit Pawar In Satara | महायुतीमध्ये (Mahayuti) अजित पवार गटाला चार जागांवर समाधान मानावे लागले आहे. अजित पवार यांनी आपल्या कोट्यातून परभणीची (Parbhani Lok Sabha) जागा रासपचे नेते महादेव जानकर (Mahadev Jankar) यांना दिली. यामुळे अजित पवार गटाची एक जागा कमी झाली आहे. परभणीतून राजेश विटेकर यांनी निवडणूक लढवण्याची तयारी केली होती. मात्र, अजित पवारांनी ही जागा रासपला देऊन विटेकर यांना आमदारकीचा शब्द देऊन नाराज कार्यकर्त्यांचे समाधान केले. आता साताऱ्यातूनही अजित पवार यांनी आणखी एका नेत्याला थेट खासदारकीचा शब्द दिला आहे. विशेष म्हणजे खासदार न केल्यास पवारांची औलाद सांगणार नाही, असा शब्द अजित पवारांनी स्थानिक कार्यकर्त्यांपुढे दिला आहे.(Ajit Pawar In Satara)

सातारा लोकसभा मतदारसंघात (Satara Lok Sabha) महायुतीकडून खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
लोकांमधून निवडून संसदेत जाणाऱ्या नेत्याला मतदारसंघात वेगळेच स्थान असते.
त्यामुळे, उदयनराजे या जागेसाठी आग्रही होते.
अखेर राष्ट्रवादीने साताऱ्यातील जागेवरील आपला दावा सोडल्यानंतर भाजपने उदयनराजे यांना उमेदवारी जाहीर केली.
त्यामुळे याठिकाण आता उदयनराजे विरुद्ध शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत होणार आहे.

उदयनराजे भोसले यांच्यासाठी साताऱ्यात अजित पवार यांनी सभा घेतली. यावेळी बोलताना अजित पवारांनी आणखी
एका नेत्याला खासदारीचा शब्द दिला आहे. कारण, यापूर्वी दोन लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांना अजित पवारांनी
आमदारकीचा शब्द दिला होता. आता नितीन पाटील यांना खासदारकीचा शब्द दिला आहे.
सध्या उदयनराजे भोसले हे राज्यसभेचे खासदार आहेत.
त्यामुळे ते निवडून आल्यानंतर भाजपची ही जागा खाली होणार आहे, त्या जागेवर राष्ट्रवादीला संधी दिली जाणार असल्याची चर्चा आहे.

एक लाखाचं मताधिक्य द्या

अजित पावारांनी नितीन पाटील यांना खासदारकीचा शब्द देताना कार्यकर्त्यांना एक अटही घातली आहे.
साताऱ्यातील महायुतीच्या उमेदवाराला एक लाखाच्या फरकाने निवडून द्या नितीन काकाला खासदार करणार, नाही केले तर पवारांची औलाद नाही, अशा शब्दात अजित पवारांनी जाहीर सभेतून भूमिका मांडली.
अजित पावारांनी नितीन पाटील यांना खासदारकीचा शब्द देताना कार्यकर्त्यांना एक अटही घातली आहे.
साताऱ्यातील महायुतीच्या उमेदवाराला एक लाखाच्या फरकाने निवडून द्या नितीन काकाला खासदार करणार, नाही केले तर पवारांची औलाद नाही, अशा शब्दात अजित पवारांनी जाहीर सभेतून भूमिका मांडली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ajit Pawar In Baramati Lok Sabha | खास शैलीत मतदारांना पटवण्याचा अजितदादांचा प्रयत्न, ”मी पुण्याच्या सभेत मोदी-शहांशी विकासाच्या गप्पा मारत होतो, त्यांना निधी पाहिजे सांगितले”

Uttam Jankar On Ajit Pawar | उत्तम जानकारांची अजित पवारांवर खोचक टीका, ७७ हजार कोटींचा भ्रष्टाचार केलेल्यांना चुना लावून बगळा केलं