Ajit Pawar | अजित पवारांना ईडीकडून दिलासा! ‘त्या’ प्रकरणात अजित पवारांसह सुनेत्रा पवारांचे नाव आरोपपत्रातून वगळले

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांना ईडीकडून (ED) दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक कथित घोटाळा प्रकरणात (Maharashtra State Cooperative Bank Scam Case) ईडीने अजित पवार (Ajit Pawar) आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांना दिलासा दिला आहे. अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांच्याशी संबंधित असलेल्या कंपनीविरुद्ध एमएससी बँक (MSC Bank Scam Case) घोटाळाप्रकरणी ईडीने नुकतेच आरोपपत्र (Charge Sheet) सादर केले आहे. मात्र या आरोपपत्रातून अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांची नावे वगळण्यात आली आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई सत्र न्यायालयातील (Sessions Court, Mumbai) विशेष PMLA कोर्टात (Special PMLA Court) आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या आरोपपत्रात अजित पवार (Ajit Pawar) आणि सुनेत्रा पवार यांचे नाव नाही. या प्रकरणात अजित पवार यांच्यावर अनेक आरोप झाले होते. परंतु ईडीच्या आरोपपत्रात या दोघांवर आरोपी असल्याचा ठपका नाही. मात्र अद्याप न्यायालयाकडून आरोपींची दखल घेण्यात आलेली नाही.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक प्रकरणी 19 एप्रिलला पुढील सुनावणी होणार आहे.
महत्त्वाचे म्हणजे या प्रकरणात ईडीने अजित पवार यांना कधीही चौकशीसाठी बोलावलं नाही.
जुलै 2021 मध्ये जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याची (Jarandeshwar Sakhar Karkhana) 65 कोटी
रुपयांची जमीन, इमारत आणि मशिनरी यासह एकत्रितपणे जप्त केली होती.

Web Title :-  Ajit Pawar | maharashtra state co operative bank fraud case no chargesheet against ajit pawar and sunetra pawar

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Vinayak Mete Death | विनायक मेटे अपघात प्रकरणाला नवे वळण, 2 गाड्यांनी पाठलाग केला होता

Pune Crime | सिगारेट, पाण्याच्या बाटलीवरुन दोन गटात राडा; लोखंडी कात्री, दगडाने मारहाण करुन जीवे मारण्याचा प्रयत्न

Maharashtra Political Crisis | ‘फोन उचलल्यावर वंदे मातरम म्हणणार नाही’ – छगन भुजबळ