Ajit Pawar On Pune Lok Sabha | रुसून बसू नका, तुमच्या माझ्या घरचं लग्न नाही, अजित पवारांचा कार्यकर्त्यांना प्रेमळ दम (Video)

काही दिवस डोक्यावर बर्फ ठेवून घराबाहेर पडा, अजित पवारांचा कार्यकर्त्यांना सल्ला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Ajit Pawar On Pune Lok Sabha | तुमच्या माझ्या घरचे लग्न नाही, नरेंद्र मोदींना पंतप्रधान (PM Narendra Modi) करण्यासाठी आपल्याला काम करायचं आहे. कार्यकर्त्यांनी आपल्यापरीने सगळी कामं करायची आहेत, कोणीही रुसून आणि नाराज होऊन काम करु नका, असा प्रेमळ दम राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना दिला. पुण्यात महायुतीचा (Mahayuti Melava Pune) पहिला मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते.(Ajit Pawar On Pune Lok Sabha)

कार्यकर्त्यांनी मतदार संघात कसं वागलं पाहिजे, प्रचार करताना कोणत्या पद्धतीची भाषा पाहिजे, याचे धडेदेखील अजित पवारांनी कार्यकर्त्यांना दिले. आपल्या महायुतीतील एकही कार्यकर्ता बाहेरच्या पक्षात जाणार नाही, याची काळजी घेण्याचं आवाहन अजित पवारांनी यावेळी केले.

क्षुल्लक कारणावरुन रुसु नका

अजित पवार पुढे म्हणाले, सध्या अनेक ठिकाणी रुसवेफुगवे दिसत आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आपल्याला बोलवलं नाही, आपला फोटो लावला नाही, या क्षुल्लक कारणावरुन रुसु नका, आपले सगळे मतभेद दूर केले पाहिज. हे आपल्या घरचं लग्न नाही आहे. तर आपल्याला नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान करायचं आहे. त्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांनी काम केलं पाहिजे, असा प्रेमळ दम त्यांनी दिला.

चारही उमेदवार विजयी झाले पाहिजे

नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्यासाठी महायुती एकत्र आली आहे. त्यामुळे कमळ, धनुष्यबाण आणि घड्याळाचं बटन दाबून पुणे जिल्ह्यतील चारही लोकसभा मतदारसंघातील उमेदवार निवडून आणआयचे आहेत. त्यासाठी तुम्ही कुठेही कमी पडता कामा नये, असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं.

डोक्यावर बर्फ ठेवून घराबाहेर पडा

रोज सात वाजता मी घराबाहेर पडताना तोंडात साखर ठेवून आणि डोक्यावर बर्फ ठेवून घराबाहेर पडतो. आपण आज कोणावर चिडायचं नाही आणि आरडाओरडा करायचे नाही, असं स्वत:लाच सांगतो. त्यामुळे कार्यकर्त्यांनो तुम्हीदेखील काही दिवस डोक्यावर बर्फ ठेवून घरातून बाहेर पडा, असा सल्ला अजित पवारांनी कार्यकर्त्यांना दिला.

सोशल मीडिया नीट वापरा

लोकसभेच्या निवडणुकीत कार्यकर्ता सगळ्यात महत्त्वाचा आहे.
त्यामुळे आपला कार्यकर्ता कोणत्या वेगळ्या पेक्षात जाणार नाही याकडे लक्ष ठेवा.
उलट दुसऱ्या पक्षातील कार्यकर्ते आपल्या पक्षात आणा. सोबतच आपल्या सोशल मीडियाकडे सर्वांचं लक्ष असतं.
त्यामुळे सोशल मीडिया नीट वापरा. अचारसंहितेचा भंग होणार नाही याची काळजी घ्या.
निवडणुकीत सोशल मीडिया महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
त्यामुळे सोशल मीडिया नीटच वापरला पाहिजे, असाही सल्ला अजित पवारांनी उपस्थित कार्यकर्त्यांना दिला.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Monika Murlidhar Mohol | प्रचाराच्या रणधुमाळीत मोहोळांच्या ‘होम मिनिस्टर’ देखील आघाडीवर, पहिला टप्पा पूर्ण! मोनिका मोहोळ यांची पतीला खंबीर साथ