Monika Murlidhar Mohol | प्रचाराच्या रणधुमाळीत मोहोळांच्या ‘होम मिनिस्टर’ देखील आघाडीवर, पहिला टप्पा पूर्ण! मोनिका मोहोळ यांची पतीला खंबीर साथ

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Monika Murlidhar Mohol | पुणे लोकसभा मतदारसंघातील (Pune Lok Sabha Election 2024) भाजपा उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी सुरूवातीपासून अतिशय नियोजनबद्ध असा प्रचार सुरू केला आहे. सध्यातरी ते इतरांच्या तुलनेत प्रचारात आघाडीवर आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या सुविद्य पत्नी मोनिका मोहोळ या सुद्धा त्यांच्या खांद्याला खांदा लावून निवडणुकीच्या रणांगणात प्रचारासाठी उतरल्या आहेत. मुरलीधर मोहोळ यांच्याप्रमाणेच त्यांनी प्रत्यक्ष गाठीभेटींवर भर दिला आहे. त्यांनी प्रचाराचा पहिला टप्पा देखील पूर्ण केला असून आता पुढील नियोजनाकडे त्या वळल्या आहेत.

प्रचाराची पहिली फेरी यशस्वीपणे आणि उत्स्फुर्त अशा प्रतिसादासह पूर्ण केल्यानंतर याबाबत माहिती देताना मोनिका मोहोळ म्हणाल्या, मी महापालिकेत नगरसेविका म्हणून काम केले आहे. यात महापालिकेत अनेक सहकारी नगरसेवकांशी नव्याने ओळख झाल्या, मैत्रीही झाली. या पाच वर्षात समाजकारण आणि लोकांची कामे करण्याचे स्वातंत्र्य देत मुरलीधरआण्णांनी मला एकप्रकारे प्रशिक्षणच दिले आहे.

त्या पुढे म्हणाल्या, लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारात पुढे कधीतरी सहभागी व्हावेच लागणार होते, मग सुरूवातीपासूनच का आपण यात सहभागी होऊ नये, म्हणून या अनुभवाच्या जोरावरच मी सुरूवातीपासूनच प्रचारात सक्रिय होण्याचे ठरवले आणि त्याप्रमाणे स्वतंत्रपणे भेटीगाठी घेतल्या.

मोनिका मोहोळ म्हणाल्या, मला जवळपास पाच निवडणुकींचा अनुभव आहे. तो अनुभव आज महत्त्वाचा ठरत आहे.
भेटीगाठींमधून नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जनसामान्यांच्या विश्वासाची साक्ष पदोपदी मिळत आहे.

सौ. मोहोळ म्हणाल्या, मी जवळपास सहाही विधानसभा मतदारसंघात जाऊन आले आहे.
यापुढेही पक्षाच्या वतीने जसे नियोजन केले असेल तसे प्रचारात आपण सहभागी होणार आहे.

तर दुसरीकडे भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-रिपब्लीकन पक्ष (आठवले गट) व मित्र पक्षांच्या महायुतीचे उमेदवार
मुरलीधर मोहोळ यांनीही प्रचाराचा धडाक सुरू केला आहे. संपूर्ण यंत्रणा प्रचाराच्या कामाला लागली आहे.
मोहोळ यांनी वैयक्तिक गाठीभेटींवर जोर दिला आहे.
तसेच शहरातील विविध समाज संघटना, विविध क्षेत्रातील नामवंत, पक्षातील ज्येष्ठ नेते यांच्या भेटी ते घेत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pimpri Chinchwad Crime | पिंपरी : कौटुंबिक कारणावरुन पत्नीला मारहाण, जाब विचारणाऱ्या दोघांवर चाकूने वार; एकाला अटक

Amol Kolhe On BJP Govt | डॉ. अमोल कोल्हे यांनी भाजपावर उगारला टीकेचा ‘आसूड’, केंद्राच्या चुकीच्या धोरणांमुळे कांदा, सोयाबिन, दूध उत्पादक शेतकरी…