Ajit Pawar On Sharad Pawar | ह्यांनी केलं की स्ट्रॅटेजी मी केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Ajit Pawar On Sharad Pawar | राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर यंदा पहिल्यांदाच लोकसभेची निवडणूक होत आहे. या निवडणुकीत अजित पवार गट आणि शरद पवार गट आमने सामने आले आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघात (Baramati Lok Sabha) राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमध्ये अटीतटीची लढाई होत आहे. दरम्यान, अजित पवार आणि शरद पवार यांच्यात आरोप प्रत्यारोपांची जुगलबंदी रंगली आहे. दोन्ही नेते एकमेकांवर जोरदार टीका करत आहेत. आज फोडाफोडीच्या राजकारणावरुन अजित पवार यांनी शरद पवार यांना लक्ष्य केलं. शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आणि मी केली की गद्दारी? असा सवाल अजित पवारांनी विचारला आहे.(Ajit Pawar On Sharad Pawar)

शरद पवार यांनी पक्ष फोडल्यानंतर केलेल्या टीकेवर बोलताना अजित पवार म्हणाले, 1978 साली वसंतदांसोबत काय घडलं
त्याबाबत संजयभैय्या बोललेत.
वसंतदादा शेतकऱ्यांचे लोकप्रिय नेते होते. त्यांच्या नेतृत्वात सरकारचं कामकाज सुरु होतं. मात्र, ते सरकार पाडलं गेलं.
मग जनता पक्षाला घेऊन सरकार स्थापन केलं. त्यावेळी शरद पवार यांनी यशवंराव चव्हाणांचं ऐकलं नाही.
ज्यांनी संधी दिली त्यांचंही ऐकलं नाही, असे म्हणत त्यांनी शरद पवारांवर निशाणा साधला.

अजित पवार पुढे म्हणाले, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) 2014 मध्ये मुख्यमंत्री झाले.
त्यावेळी मी मुंबईला पोहोचेपर्यंत प्रफुल्ल पटेल यांनी भाजपला राष्ट्रवादी काँग्रेसचा बाहेरुन पाठिंबा आहे, असं जाहीर केलं.
मी म्हटलं हे कसं काय झालं. तर मला म्हणाले ही आपली स्ट्रॅटेजी आहे. म्हणजे ह्यांनी केलं की स्ट्रॅटेजी मी केली की गद्दारी.
मी केलं की वाटोळं, असं विधान त्यांनी केलं.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police News | पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशानुसार शहरातील प्रत्येक पोलीस स्टेशन, पोलीस चौकीत अट्टल गुन्हेगारांची परेड (Videos)

Shivajirao Adhalrao Patil On Amol Kolhe | अमोल कोल्हेंनी केलेल्या ‘त्या’ आरोपाने आढळराव संतापले, म्हणाले ”पुरावे द्या, मी निवडणुकीतून माघार घेतो, अथवा तुम्ही बाहेर पडा”