Ajit Pawar On Supriya Sule | सुप्रिया सुळेंच्या ‘त्या’ प्रश्नाला प्रत्युत्तर देताना अजित पवार म्हणाले, आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, म्हणून…

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Ajit Pawar On Supriya Sule | बारामती लोकसभा मतदारसंघात (Baramati Lok Sabha) नणंद सुप्रिया सुळे विरूद्ध भावजयी सुनेत्रा अजित पवार (Sunetra Ajit Pawar) अशी लढत आहे. पण, प्रत्यक्षात राजकारणात भावजयी नवखी असल्याने बहिण विरूद्ध भाऊ असाच राजकीय कलगीतुरा सातत्याने रंगत असल्याचे दिसत आहे. अजित पवार हे विविध मुद्द्यांवरून सुप्रिया सुळे यांच्यावर निशाणा साधत आहेत. यावरून सुळे यांनी, आताच माझ्यातील वाईट गुण कसे दिसायला लागलेत, असा सवाल केला होता. त्याला आज अजित पवारांनी उत्तर दिले.(Ajit Pawar On Supriya Sule)

पुण्यात महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित केलेल्या एका कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी अजित पवारांनी सुप्रिया सुळे यांनी विचारलेल्या प्रश्नाला प्रत्युत्तर दिले.

माझ्यात वाईट गुण होते तर इतके वर्ष गप्प का बसलात? या सुप्रिया सुळेंच्या प्रश्नाला उत्तर देताना अजित पवार म्हणाले, आमच्या डोक्यात प्रकाश पडायला १७ वर्ष लागली म्हणून आत्ता सगळे आठवत आहे.

काय म्हणाल्या होत्या सुप्रिया सुळे…
अजित पवार यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या की, सतरा-आठरा वर्ष आम्ही एका संघटनेत काम केले आहे.
घटस्फोट होऊन सहाच महिने झाले आहेत. पण माझ्यातले असे वाईट गुण लोक सांगत आहेत, जे मी कधी ऐकलेले पण नाहीत.

पण माझा त्यांना एक प्रश्न आहे, जर इतके माझ्यात वाईट गुण होते तर सतरा-साडेसतरा वर्ष गप्प कशाला बसलात?
असे काय झाले आहे की आता तुम्हाला हे सगळे दिसायला लागले? आत्ता माझ्या चुका का दिसत आहेत?
असा प्रश्न सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांना विचाला होता.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Congress News | शरद पवारांबद्दलचे पंतप्रधानांचे वक्तव्य दुदैवी; काँग्रेसचे जेष्ठ नेते उल्हास पवार यांची खंत

Uddhav Thackeray Sabha In Warje Pune | सत्तेसाठी वखवखलेला औरंगजेबच्या गुजरातमधील ‘वखवखलेला’ आत्मा महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात फिरत आहे; छत्रपतींच्या स्वाभीमानी महाराष्ट्रातील जनता त्याचे स्वप्न पूर्ण होउ देणार नाही, उद्धव ठाकरे यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला