संमेलनाध्यक्ष फ्रान्सिस दिब्रेटो यांची तब्येत खालावली

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – उस्मानाबाद येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फ्रान्सिस दिब्रेटो यांची तब्येत खालावली आहे. त्यामुळे उद्या संमेलनाला येणार की नाही याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी दिब्रेटो यांची निवड झाल्यामुळे वाद निर्माण झाला होता.

मराठी साहित्य संमेलन उद्यावर येऊन ठेपले आहे. परंतु, संमेलनाच्या पूर्वसंध्येला संमेलनाध्यक्ष फ्रान्सिस दिब्रेटो यांची प्रकृती खालावली आहे. आज सकाळपासून दिब्रेटो यांच्यावर उपचार सुरु आहेत. डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला आहे. दरम्यान, संमेलन उद्यावर येऊन ठपले असताना नवा वादाला तोंड फुटले आहे. संमेलनाचे उद्घाटक पद्मश्री ना. धो. महानोर यांना संमेलनात न जाण्याची धमकी दिली आहे.

ख्रिस्ती धर्मगुरु फादर फ्रान्सिस दिब्रेटो अध्यक्ष असलेल्या संमेलनाचे तुम्ही उद्घाटक होऊ नका, असे सांगणारे फोन सातत्याने येत असले तरी आपण उद्घाटक म्हणून संमेलनाला नक्कीच उपस्थित राहणार असल्याचे महानोर यांनी स्पष्ट केले आहे. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी फोन करून संमेलनाला जाऊ नका, असे मनोहर यांना सांगितले होते.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/