Akshay Kumar | अक्षय कुमारच्या आगामी चित्रपटाच्या मेकअप आर्टिस्टवर बिबट्याने केला हल्ला; व्हिडिओ व्हायरल

पोलीसनामा ऑनलाईन : सध्या अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि टायगर श्रॉफ त्यांचा आगामी चित्रपट ‘बडे मिया छोटे मिया’ या चित्रपटामध्ये व्यस्त आहेत. तर या चित्रपटाच्या सेटवरून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. या चित्रपटाचा मेकअप आर्टिस्ट श्रवण विश्वकर्मावर एका बिबट्याने हल्ला केला आहे. सध्या श्रवणला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 27 वर्षीय श्रवण बाईक वरून जात असताना ही घटना घडली आहे. श्रवणला काही लोकांनी बेशुद्ध अवस्थेत पाहिल्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल केले. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. (Akshay Kumar)
सध्या रुग्णालयात मेकअप आर्टिस्ट श्रवण विश्वकर्मा याच्यावर उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार श्रवणने सांगितले की “मी मित्राला सेटवर सोडण्यासाठी जात असतानाच ही घटना घडली. शूट लोकेशन काही अंतरावरच होते त्याआधी आम्हाला एक डुक्कर रस्त्यावर पळताना दिसत होता. यावेळी मी बाईकचा स्पीड थोडासा वाढवला तेव्हा माझ्या लक्षात आले की या डुकराच्या मागे एक बिबट्या लागला आहे”. (Akshay Kumar)
#Leopard #ATTACK'in film City road in #Mumbai …
Leopard attack Shravan Vishwakarma,who works as a make-up artist in the film industry.#forest@MumbaiPolice pic.twitter.com/2bKCckPGJP
— Indrajeet chaubey (@indrajeet8080) February 17, 2023
पुढे बोलताना श्रवण म्हणाला “यावेळी माझ्या बाईकची टक्कर बिबट्याशी झाली मला तेव्हा काहीच कळले नाही.
मी बाईकवरून खाली पडलो एवढेच मला आठवतं. मी खाली पडल्यानंतर तो बिबट्या माझ्या आसपास फिरत होता.
त्यानंतर नेमके काय झाले हे मला आठवत नाही. कारण मी बेशुद्ध झालो होतो .
कदाचित काही लोकांनी मला तिथे पाहिलं आणि तत्काळ डॉक्टरांकडे आणलं”.
आता या घटनेनंतर ऑल इंडिया सिने वर्कर्सचे अध्यक्ष सुरेश शामलाल गुप्ता यांनी या घटनेत सरकारला गांभीर्याने लक्ष घालण्याचा आग्रह केला आहे.
तर सोशल मीडियावर या अपघाताचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात वायरल होताना दिसत आहे.
Web Title :- Akshay Kumar | akshay kumar upcoming film bade miyan chote miyan makeup artist attacked by leopard
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update