Akshay Kumar | अक्षय कुमारचा अनोखा अंदाज पाहून ट्विंकल खन्नाने केले ट्रोल

पोलीसनामा ऑनलाइन : सध्या अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) हा फॅमिलीसोबत वेकेशन एन्जॉय करताना दिसत आहे. अक्षय (Akshay Kumar) हा कुटुंबासोबत गोव्यात क्रिसमस आणि न्यू इयर सेलिब्रेशन साठी सज्ज आहे. त्यांनी इंस्टाग्रामवर नुकताच त्याचा एक व्हिडिओ शेअर केला. जे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. त्या व्हिडिओला मात्र त्याच्या पत्नीने ट्विंकल खन्नाने कमेंट करत ट्रोल केले आहे.

या व्हिडिओमध्ये अक्षय कुमार पूलच्या शेजारी उभारून गिटार वाजवत गाणी गाताना दिसत आहे. यावेळी त्यांनी काळ्या रंगाचा हाफ जॅकेट आणि जीन्स पॅन्ट परिधान केले आहे. अक्षयचा हा मजेशीर व्हिडिओ चाहत्यांना खूपच आवडला आणि त्यांनी त्यावर कमेंट देखील केले. मात्र हा व्हिडिओ ट्विंकल खन्ना ला फारसा भावला नसल्याचे दिसले. सध्या व्हिडिओ वरील ट्विंकल खन्नाची कमेंट चर्चेचा विषय बनली आहे.

अक्षयच्या (Akshay Kumar) व्हिडिओ वर कमेंट करत ट्विंकल खन्नाने म्हटले की,
“मला आनंद आहे की यावेळी मी दुसऱ्या रूममध्ये होते. मी प्रत्यक्षात तुला असे गाताना आणि नाचताना पाहिले
नाही आणि ते मला दिसलेही नाही”. या कमेंट सोबत तिने स्मायलीचे इमोजी टाकले आहे.
ट्विंकल खन्नाच्या या मजेशीर कमेंट ने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.
यंदाच्या वर्षी अक्षय कुमारचे चित्रपट जरी बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करू शकले नसले तरी पुढच्या
वर्षी अक्षय कुमार ‘सेल्फी’ आणि ‘गोरखा’ या चित्रपटांमधून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Web Title :-Akshay Kumar | twinkle khanna commented on akshay kumars video

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Resham Tipnis | ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीवर कोसळला दुःखाचा डोंगर; पोस्ट शेअर करत दिली माहिती

Devendra Fadnavis | … तर नक्कीच कठोर कारवाई केली जाईल, अजित पवारांनी अब्दुल सत्तारांवर केलेल्या आरोपांची फडणवीसांकडून गंभीर दखल