Devendra Fadnavis | … तर नक्कीच कठोर कारवाई केली जाईल, अजित पवारांनी अब्दुल सत्तारांवर केलेल्या आरोपांची फडणवीसांकडून गंभीर दखल

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) हे कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्याविरोधात आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले. सिल्लोड येथील कृषी महोत्सवावरुन (Krushi Mahotsav in Sillod) अजित पवार यांनी सत्तार यांच्यावर गंभीर आरोप केले. कृषी महोत्सवाच्या नावाने तिकीट छापून वसुली केली जात असल्याचा आरोप अजित पवार यांनी केला. त्यांच्या या आरोपांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी गंभीर दखल घेतली. तसेच असा प्रकार घडला असेल तर नक्कीच कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली.

काय म्हणाले अजित पवार?

अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड मतदारसंघात होत असलेल्या ‘सिल्लोड कृषी महोत्सवा’साठी कृषी विभाग चक्क वसुली मोहीम राबवत असल्याचा गंभीर आरोप (Allegation) अजित पवार यांनी केला. यासाठी तिकीट छापण्यात आले असून, त्यासाठी काही दर निश्चित करण्यात आले आहेत. ज्या जिल्ह्यात 10 पेक्षा अधिक तालुके आहेत त्या ठिकाणी प्लॅटिनम प्रवेशिका देण्यात आली असून, त्यासाठी 25 हजार रुपये दर ठरवण्यात आला आहे. तर इतर प्रवेशिकांचे पाच हजार, साडेसात हजार आणि दहा हजार रुपये दर ठरवण्यात आले आहेत. याचे माझ्याकडे पुरावे असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

तर कडक कारवाई करु

अजित पवार यांनी केलेल्या आरोपांना उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)
म्हणाले की, सिल्लोडबाबत ज्या काही बातम्या आल्या आहेत त्याची गंभीर दखल घेतली जाईल.
तसेच या संदर्भात कुठेही असे चालले असेल तर त्याच्यावर कडक कारवाई (Strict Action) सरकार करेल
अशी माहिती फडणवीस यांनी दिली.

Web Title :- Devendra Fadnavis | collected in the name of agricultural festival devendra fadnavis takes serious notice of ajit pawar allegation

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Anti Aging | वृद्धत्व येऊ शकते या डाएटमुळे, खाण्यापूर्वी जाणून घ्या अनेक प्रकारचे दुष्परिणाम

Maharashtra Karnataka Border Dispute | …तोपर्यंत सीमाभाग केंद्रशासित करा, उद्धव ठाकरेंची अधिवेशनात मागणी

Winter Session | ‘त्यांना टोमणे मारण्याची सवय, फार गांभीर्याने घेण्याची गरज नाही’, उद्धव ठाकरेंच्या टीकेवर शिंदे गटाचा पलटवार

Diabetes Diet | किचनमधील ‘या’ मसाल्याने डायबिटीजमध्ये मिळेल दिलासा, जाणून घ्या वापर करण्याची विशेष पद्धत