
Akshaya Deodhar | अक्षयाची लग्नानंतर पहिली मकरसंक्रांत व्हिडिओ शेअर करत दिल्या शुभेच्छा
पोलीसनामा ऑनलाइन : सध्या लोकप्रिय जोडी म्हणून चर्चेत असलेली जोडी म्हणजे हार्दिक जोशी व अक्षया देवधर (Akshaya Deodhar). यांनी 2 डिसेंबरला आपल्या खऱ्या आयुष्यात लग्नगाठ बांधत एकमेकांसोबत नव्या आयुष्याची सुरुवात केली आहे. दोघेही सध्या त्यांच्या विवाहित जीवनाचा आनंद घेताना दिसत आहेत. तर नुकताच अक्षयाने (Akshaya Deodhar) शेअर केलेला एक व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल होताना दिसत आहे.
अक्षया सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. ती तिचे फोटोज व्हिडिओज चाहत्यांसाठी शेअर करत असते. आता लग्नानंतर अक्षयाची ही पहिली संक्रांत आहे. त्यानिमित्ताने तिने काळ्या साडीतील एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये तिने काळी काठापदराची साडी, नाकात आणि गळ्यात मोत्याची माळ, मंगळसूत्र तसेच अंबाडा बांधत गजरा देखील माळला आहे. व्हिडिओ शेअर करत अक्षयाने कॅप्शनमध्ये म्हटले की ‘सुख कळले’. सध्या अक्षयाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनत चालला आहे.
अक्षयाच्या (Akshaya Deodhar) या व्हिडिओवर चाहत्यांनी तिला पहिल्या मकर संक्रांतीच्या शुभेच्छा
दिल्या आहेत. तर अनेकांनी या व्हिडिओला लाईक देखील केले आहेत. या व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंट करत
म्हटले की, “पाठक बाई खूपच सुंदर”, “पाठक बाई छान दिसत आहेत”, “तुमची साडी खूपच सुंदर आहे”.
अशा एक ना अनेक कमेंट या व्हिडिओवर येत आहेत.
Web Title :-Akshaya Deodhar | akshaya deodhar makar sankrant special look viral video wedding with hardik joshi
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update