चिंताजनक ! पवित्र इंद्रायणी पुन्हा फेसाळली, आळंदी आणि परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका

आळंदी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी -चिंचवड महापालिका हद्दीतून रसायनयुक्त सांडपाणी थेट नदीपात्रात सोडल्याने तीर्थक्षेत्र आळंदीतील (alandi) इंद्रायणी नदी सलग दुस-यांदा फेसाळली आहे. नदीपात्रात साबणाच्या पाण्यासारखा फेस तरंगत आहे.

Pune Fire News | पिरंगुट भागातील सॅनीटायझर बनविणाऱ्या कंपनीत भीषण आग (व्हिडिओ)

इंद्रायणीतील रसायनयुक्त पाणी पाहून भाविकांनी तसेच आळंदीकरांनी नाराजी व्यक्त केली आहे. आळंदीतील (alandi) नागरिकांना हेच पाणी पिण्यासाठी वापरावे लागत असल्याने स्थानिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
प्रशासनाने इंद्रायणीला पूर्वीप्रमाणे वैभव प्राप्त करून देण्यासाठी नदी सुधार योजनेची अंमलबजावणी करावी, अशी मागणी स्थानिक करत आहेत.

Helmets New Rule : केंद्र सरकारकडून हेल्मेटबाबतचे नवीन नियम लागू ! 5 लाखांचा दंड अन् 1 वर्षाची कैद, जाणून घ्या

पिंपरी चिंचवड औद्योगिक नगरीतील विविध उद्योगातील रसायनयुक्त सांडपाणी थेट नदीत मिसळले जाते.
त्यामुळे नदी प्रदुषित झाली आहे.
गेल्या महिन्यात देखील रासायनिक मिश्रणांने इंद्रायणी फेसाळली होती.
परिणामी दिवसेंदिवस प्रदुषण वाढत चालल्याने जलचर प्राण्यांना फटका बसत आहे.
तसेच नदीकाठची शेती प्रदुषित पाण्यामुळे धोक्यात आली आहे.
आळंदी शहरात आणि नदीकाठच्या गावांमध्ये डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे.
उद्योगनगरीतील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी अब्जावधी रुपयांचा खर्च करून प्रकल्प उभारले आहेत.
उभारलेले प्रकल्प चालवण्यासाठी वर्षाला कोट्यवधीचा खर्च केला जातो.
तरीही सांडपाण्यावर प्रक्रिया न करता ते पाणी तसेच नदीत सोडले जात असल्याने नदीला गटाराचे स्वरुप आले आहे.
विशेष म्हणजे वारंवार प्रशासनाकडे इंद्रायणी प्रदूषण मुक्त करण्याची मागणी करूनही दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये कमालीची नाराजी पसरली आहे.

Also Read This : 

 

रिया चक्रवर्ती ठरली बॉलिवूडमधील सर्वात प्रभावी अभिनेत्री, दीपिका-कतरिनालाही टाकल मागे

 

जाणून घ्या अँड्रॉयड युजर्संसाठी ‘व्हॉट्सअ‍ॅप’चे ‘फ्लॅश कॉल्स’ फीचर