Alia Bhatt | गोंडस मुलीला जन्म दिल्या नंतर आलियाने केली पहिली पोस्ट; सोशल मीडियावर व्हायरल

पोलीसनामा ऑनलाईन : आज म्हणजेच 6 नोव्हेंबर रोजी आलियाने (Alia Bhatt) गोंडस अशा मुलीला (Baby Girl) जन्म दिला आहे. मुलीचा जन्म झाल्यानंतर पहिल्यांदाच आलियाने पहिली पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. सध्या कपूर कुटुंबात जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळत आहे. आज सकाळीच आलियाला (Alia Bhatt) मुंबईतील एच. एन. रिलायन्स (H.N.Reliance Hospital) रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आलियाची हि पोस्ट सोशल मीडियावर जोरात व्हायरल होत आहे.

आलियाने instagram वर पोस्ट शेअर केली असून यात तिने असे म्हटले आहे की, “आमच्या आयुष्यातील ही सर्वोत्कृष्ट बातमी आहे. आमचं बाळ या जगात आले आहे आणि अत्यंत जादुई भासणारी ही कन्या आहे. आमच्यावर जणू प्रेमाचा वर्षावच झाला आहे. रणबीर आणि मी आता अधिकृतरित्या पालक झाले आहोत”. आलियाच्या या पोस्टवर अनेकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. तिच्या पोस्टवर सोनम कपूर (Sonam Kapoor) ने कमेंट करत म्हटले की, “तुला खूप खूप शुभेच्छा आणि तुझ्या राजकुमारीला पाहण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहोत”. तर श्वेता बच्चनने (Shweta Bachchan) देखील ,”तुम्हा दोघांना शुभेच्छा. सदैव आनंदी आणि स्वस्थ राहा” अशा शब्दांत शुभेच्छा दिल्या आहेत.

झोया अख्तर, सोफी चौधरी, नेहा धुपिया, रोहन श्रेष्ठा, कपिल शर्मा, रिया कपूर, इशान खट्टर, मौनी रॉय,
सानिया मिर्झा यांसारख्या सेलिब्रिटींनीही आलियाच्या या पोस्टवर कंमेंट्स करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत.
आलिया आणि रणवीर च्या लग्नानंतर आलियाने पहिल्यांदाच इंस्टाग्राम वर अल्ट्रासाउंडचा फोटो पोस्ट करत
तिच्या चाहत्यांना ही गुडन्यूज दिली होती. तेव्हापासून ते आजपर्यंत आलियाचे चाहते तिच्या बाळाची आतुरतेने वाट पाहत होते. आज आलियाच्या या पोस्टवर शुभेच्छांचा जणू काही वर्षावच होत आहे.

Web Title :- Alia Bhatt | alia bhatt first post after she and ranbir kapoor become proud parents to baby girl

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Yash | केजीएफ स्टार यशचं वक्तव्य चर्चेत ; चाहत्यांवर केली ‘ही’ टीका

Sambhaji Raje Chhatrapati | ‘चित्रपटांतून इतिहासाची मोडतोड, असे सिनेमे काढाल तर गाठ माझ्याशी’; संभाजीराजेची आक्रमक भूमिका