Yash | केजीएफ स्टार यशचं वक्तव्य चर्चेत ; चाहत्यांवर केली ‘ही’ टीका

पोलीसनामा ऑनलाईन : सध्या सोशल मीडियावर (Social Media) सर्वत्र दक्षिणात्य चित्रपटांची चर्चा होताना दिसत आहे. तर अशातच दाक्षिणात्य सुपरस्टार यशने (Yash) एक मोठे विधान केले आहे. यशचे हे विधान सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखे व्हायरल होत आहे. ‘केजीएफ’ (KGF) आणि ‘केजीएफ चाप्टर टू’ (KGF: Chapter 2) या चित्रपटाच्या माध्यमातून यश (Yash) चाहत्यांच्या मनामनात पोहोचला होता. त्याला संपूर्ण देशातून भरभरून प्रेम देखील मिळाले होते. एवढेच नाही तर हिंदी चित्रपट सृष्टीतही यशचा मोठा चाहता वर्ग आहे. सध्या एका मुलाखतीत यशने बॉलीवूड (Bollywood) इंडस्ट्रीवर आपली प्रतिक्रिया दिली त्याचे हे वक्तव्य चर्चेत आहे.

या मुलाखतीत यश (Yash) म्हणाला, “काही वर्षांपूर्वी दाक्षिणात्य चित्रपटांची (South Movies) अक्षरशः खिल्ली उडवली जायची. दाक्षिणात्य चित्रपटातील ॲक्शन सीन (Action Scene) पाहून लोक हसायचे. मात्र आता ते दिवस गेले आता हिंदी चॅनल्सवर तेलगू, कन्नड, तमिळ चित्रपट दाखवले जातात. एवढेच नाही तर दाक्षिणात्य चित्रपटांचे रिमिक्स देखील बनवले जाते. या अशा रिमेक चित्रपटांना एवढा चांगला प्रतिसाद मिळताना काही दिसत नाही”.

यश पुढे म्हणाला, “सगळ्यात मोठी समस्या होती ती म्हणजे आमचे चित्रपट कमी किमतीत विकले जायचे आणि काही लोक आमचे चित्रपट अगदी वाईट पद्धतीने डब करायचे. त्यामुळे ते लोकांना त्या पद्धतीने दिसायचे.
पण आता लोकांना आमचा आर्ट फॉर्म समजतोय लोकांना आमचे चित्रपट आता समजतात.
याचा मोठा श्रेय हे एस एस राजामौली (SS Rajamouli) यांना जातो. बाहुबली (Bahubali Movie) या
चित्रपटाने दाक्षिणात्य चित्रपटांची जणू काही काया पलटच केली आहे.
एवढेच नाही तर केजीएफ एक विशिष्ट हेतू समोर ठेवून बनवण्यात आली होती”.

दाक्षिणात्य चित्रपटाने यंदाच्या वर्षी बॉक्स ऑफिसवर (Box Office) मोठा गल्ला केला आहे.
एवढेच नाही तर टॉप 10 चित्रपटांच्या यादीत केवळ चारच बॉलीवूड चित्रपट आहेत तर सर्व दक्षिणात्य चित्रपट आहेत.
केजीएफ चाप्टर टू ने तर 2022 मध्ये सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट म्हणून जाहीर झाला.
या चित्रपटाने जगभरात 1207 कोटी रुपयांची कमाई केली. तर एस एस राजामौली यांचा ‘RRR” हा चित्रपट ने
देखील सर्वाधिक कमाई केली होती.

Web Title :-  Yash | kgf star yash open on making fun of south film by north indians

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sambhaji Raje Chhatrapati | ‘चित्रपटांतून इतिहासाची मोडतोड, असे सिनेमे काढाल तर गाठ माझ्याशी’; संभाजीराजेची आक्रमक भूमिका

Narayan Rane | ‘नोटां’ची मत भाजपची, ऋतुजा लटकेंच्या आरोपाला नारायण राणेंचे प्रत्युत्तर; म्हणाले- ‘आधी प्रमाणपत्र हातात घ्यावं, मगच…’

Andheri Bypoll Result | ‘नोटा’चा अर्थ शिल्लकसेनेला कळत असावा…, शिंदे गटातील नेत्याचा घणाघात