Alia Bhatt | रणबीरला आवडत नाही आलियाने लावलेली लिपस्टिक; आलियाने केला खुलासा

पोलीसनामा ऑनलाइन – Alia Bhatt | बॉलीवुडची प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्ट ही तिच्या चित्रपटांमुळे व अभिनयामुळे नेहमी चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेला तिच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ (Rocky Aur Rani Ki Prem Kahani) या चित्रपटामधील तिची भूमिका खूप गाजली. यामध्ये तिने अभिनेता ऱणवीर सिंग (Ranveer Singh) सोबत स्क्रीन शेअर केली होती. आता पुन्हा एकदा आलियाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये आलियाने तिच्या नवऱ्याला अर्थात अभिनेता रणबीर कपूरला तिने लिपस्टिक लावलेली आवडत नसल्याचे (Alia Bhatt And Ranbir Kapoor) सांगितले आहे. आलियाचा हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत असून यामुळे रणबीर कपूरला ट्रोल केले जात आहे.

अभिनेत्री आलिया भट्ट हिने वोग इंडिया (Vogue India) या फॅशन ब्रॅंडसाठी एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ती तिची हटके लिपस्टिक लावण्याची पद्धत दाखवत आहे. इतर लोक वेगळ्या पद्धतीने लिपस्टिक लावतात आणि आलिया मात्र वेगळ्या प्रकारे लावते. तिने तिची आवडती लिपस्टिक जी तिने लग्नामध्ये देखील लावली होती ती देखील व्हिडिओमध्ये शेअर केली आहे. ती म्हणाली की, मी लिपस्टिक जेवण झाल्यावर लावते. आणि लावल्यानंतर देखील ती मी पुसून टाकते. तसेच आलिया म्हणाली की तिच्या नवऱ्याला तिने लिपस्टिक लावलेले आवडत नाही. मी जेव्हा पण त्याच्या सोबत बाहेर जाते तर मी लिपस्टिक पुसूनच जाते. हे आत्ताच नाही तर तो माझा बॉयफ्रेंड होता तेव्हापासूनच तो मला ते आधी पुसून टाक असे सांगत आला आहे. त्याला माझ्या ओठांचा खरा रंग जास्त आवडतो असे देखील आलियाने सांगितले आहे.

मात्र तिच्या या बोलण्यावर अनेकांनी आक्षेप घेतला आहे. नेटकऱ्यांनी अभिनेता रणबीर कपूरला त्याच्या वागणूकीवरुन
ट्रोल (Ranbir Kapoor Troll) केले आहे. त्याचे वागणे हे पुरुषी विचारधारेचे आहे असे म्हणणे अनेकांनी व्यक्त केले आहेत.
तर काही नेटकऱ्यांनी ही त्यांची वैयक्तिक गोष्ट आहे असे मत व्यक्त केले आहे.

अभिनेता रणबीर कपूर व अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt And Ranbir Kapoor) हे बॉलीवुडमधील प्रसिद्ध कपल आहे.
त्यांनी ब्रह्मास्त्र या चित्रपटामध्ये (Brahmastra Movie) एकत्र काम केले होते.
त्यांची ऑनस्क्रीन जोडी प्रेक्षकांना खूप आवडली होती त्याचप्रमाणे या रिअल लाईफ कपलचा चाहता वर्ग मोठा आहे.
रणबीर काही दिवसांपूर्वी ‘तू झूठी मैं मक्कार’ या चित्रपटामध्ये (Tu Jhoothi Main Makkaar Movie) झळकला होता.
आलिया व रणबीर यांना ‘राहा’ (Raha Kapoor) नावाची गोंडस मुलगी देखील आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maratha Entrepreneurs Association (MEA) | उद्योगासाठी मराठा तरुणांना महामंडळाचे अर्थसहाय्य; नरेंद्र पाटील यांचे मत

Fidel Technologies Sunil Kulkarni | तंत्रज्ञान, कौशल्य अवगत करत स्वतःला ‘अपग्रेड’ ठेवावे; सुनील कुलकर्णी यांचा सल्ला