Alia Bhatt | आलिया भट्ट करणार स्पाय-युनिव्हर्सवर आधारित चित्रपटात जबरदस्त भूमिका: सोबत शर्वरी वाघ झळकणार

पोलीसनामा ऑनलाइन – Alia Bhatt | सध्या बॉलीवुडमध्ये स्पाय-युनिव्हर्सवर आधारित चित्रपट (Film on Spy Universe) निर्मित करण्याचा ट्रेन्ड आला आहे. आतापर्यंत अनेक स्पाय-युनिव्हर्सवर आधारित चित्रपट बनवण्यात आले असून प्रेक्षकांनी देखील या चित्रपटांना उदंड प्रतिसाद दिला आहे. स्पाय-युनिव्हर्सवर आधारित बॉलीवुड चित्रपटांमध्ये एक था टायगर (Ek Tha Tiger), पठान (Pathan), टायगर जिंदा है (Tiger Zinda Hai), वॉर (War) या चित्रपटांचा समावेश आहे. आता लवकरच आणखी एक जबरदस्त स्पाय-युनिव्हर्सवर आधारित बॉलीवुड चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटांमध्ये नुकताच राष्ट्रीय पुरस्कार जिंकलेली अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) प्रमुख भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटाची निर्मिती आदित्य चोप्रा (Aditya Chopra) करणार आहे. ‘स्पाय-युनिव्हर्स’चा गुप्तचर अशा आशयाचा हा चित्रपट असणार आहे. यामध्ये अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) सोबत अभिनेत्री शर्वरी वाघ (Sharvari Wagh) ही देखील स्क्रीन शेअर करणार आहे.

स्पाय-युनिव्हर्सवर आधारित चित्रपटाची निर्मिती ही नेहमी भव्य दिव्य असते. आदित्य शर्मा या चित्रपटाच्या निमित्ताने YRF स्पाय युनिव्हर्सचा विस्तार करण्याचा विचार करत आहे. हा चित्रपट स्पाय-युनिव्हर्समधील 8 वा चित्रपट असणार आहे. अद्याप चित्रपटाचे नाव ठरवण्यात आले नसले तरी चित्रपटामध्ये काम करणाऱ्या कलाकारांची नावे समोर येत आहे. सुप्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्ट या चित्रपटामध्ये ॲक्शन सीन करताना झळकणार आहे. तसेच यामध्ये आणखी एक लक्षवेधी चेहरा आलियासोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे ती म्हणजे अभिनेत्री शर्वरी वाघ. अभिनेत्री शर्वरी वाघ हिने ‘बंटी और बबली 2’ (Bunty Aur Babli 2) या चित्रपटातून बॉलीवुडमध्ये काम करण्यास सुरुवात केली.

मनोरंजन विश्वाशी निगडित असलेल्या लोकांच्या मते अभिनेत्री शर्वरी वाघ हिच्याकडे मनोरंजन विश्वातील पुढील सुपरस्टार अभिनेत्री म्हणून पाहिले जात आहे. तिच्या अभिनय कौशल्याची झलक शर्वरीने पहिल्याच चित्रपटांमध्ये दाखवली होती. तेव्हा पासून तिने अनेक चित्रपट निर्मात्यांची मने अभिनयाने जिंकली आहे. तिच्या या कौशल्यामुळे आदित्य चोप्रा यांनी देखील आपल्या पुढील स्पाय-युनिव्हर्सवर आधारित चित्रपटामध्ये अभिनेत्री आलिया सोबत शर्वरीला कास्ट केले आहे. यावरुन हे लक्षात घेण्यासारखे आहे की तिच्या पिढीतील अभिनेत्रींपेक्षा पुढे आहे.

स्पाय-युनिव्हर्सवर आधारित चित्रपटांना भारतीय मार्केटमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली आहे. याला पहिल्यांदा 2012 साली प्रदर्शित झालेल्या ‘एक था टाइगर’ या चित्रपटापासून सुरुवात झाली. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. त्यानंतर ‘टाइगर जिंदा है’ (Tiger Zinda Hai), ‘वॉर’ और ‘पठान’ (Pathaan) असे अनेक चित्रपट या स्पाय-युनिव्हर्सवर आधारित काढण्यात आले. या प्रत्येक चित्रपटाने बॉक्स ऑफिस गाजवले आहे. शाहरुखच्या (SRK) ‘पठान’ चित्रपटाने तर कमाईचा रेकॉर्ड मोडला. आता लवकरच अभिनेता सलमान खानचा (Salman Khan) स्पॉय युनिव्हर्स ‘टायगर 3’ (Tiger 3) हा चित्रपट हा वर्षी दिवाळीमध्ये प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तसेच ऋतिक रोशनचा (Hrithik Roshan) ‘वॉर 2’ (War 2) हा चित्रपट देखील प्रदर्शित होणार आहे.

रोमांचकारी स्पाय-युनिव्हर्सवर आधारित चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या कलाकारांची लोकप्रियता नेहमी वाढते.
त्य़ामुळे अभिनेत्री शर्वरी वाघ हिच्यासाठी आदित्य चोप्रा यांच्या आगामी चित्रपटामध्ये काम करणे ही तिच्या
करिअरच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार आहे. अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि शर्वरी वाघ यांची जोडी
मोठ्या पडद्यावर ॲक्शन करताना दिसून येणार आहे. आदित्य शर्मा यांच्या या प्रोजक्टचे नाव अद्याप ठरवण्यात
आलेले नाही. पण पुढील वर्षी 2024 साली या चित्रपटांच्या शुटिंगला सुरुवात केली जाईल.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sindhudurg Chipi Airport Maharashtra | 1 सप्टेंबर पासून चिपी विमानतळावरून कोकणात नियमित प्रवासी विमानसेवा सुरु होणार